Weather Update | कडाक्याच्या थंडीत ढगाळ वातावरण, राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

डाक्याच्या थंडीमध्ये राज्यातील खान्देश आणि विदर्भात सरी बरसरण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. हवामान खात्याने तसा अंदाज वर्तविला आहे. येत्या सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

Weather Update | कडाक्याच्या थंडीत ढगाळ वातावरण, राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
WEATHER COLD
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 12:18 PM

मुंबई : मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे. सध्या थंडी वाढलेली असल्यामुळे उबदार पकडे घालण्याकडे कल वाढलाय. मात्र या कडाक्याच्या थंडीमध्ये राज्यातील खान्देश आणि विदर्भात सरी बरसरण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त लोकमत या वृत्तपत्रात आले आहे.

चार दिवस थंडीमध्ये कोणताही बदल होणार नाही

सध्या वातावरणातील गारवा वाढला आहे. मात्र आगामी काही दिवसांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर इतर भागात हुडहुडी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासह इतर राज्यातही कडाक्याची थंडी जाणवत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार दिवस थंडीमध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच आगामी चार दिवस सध्याची हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सकाळी धुके, तसेच अंधुकसा प्रकाश अशी स्थिती राहील.

उत्तर भारतात तुरळक ठिकाणी पाऊस, बर्फवृष्टी

दरम्यान, उत्तर भरतात कडाक्याची थंडी असून काही ठिकाणी पाऊस, बर्फवृष्टी तसेच तुरळक ठिकाणी गारपीटदेखील होऊ शकते. गारव्याची तीव्रता पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या भागात जाणवू शकतो. हरियाणात पुढचे सात दिवस थंडीची लहर असण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये मोठ्या पावसाची शक्यता असून तामिळनाडू तसेच आसपासच्या भागांत पावसाने थैमान घातले आहे. या भागाला पाऊस तसेच गारपीटीचा त्रास झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

इतर बातम्या :

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लागला, महाराष्ट्रात काय?, लॉकडाऊन झाला तर कसा असेल; विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

Mahadev Jankar | महादेव जानकरांनी दंड थोपटले, आगामी लोकसभा निवडणूक परभणीतून लढवणार

लॉकडाऊन लागणार काय?; राज्याला किती लसींची गरज, मास्क कोणता वापरावा?; वाचा तुमच्या मनातील प्रश्नांना राजेश टोपेंचे उत्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.