Weather Alert : फेब्रुवारीच्या ‘या’ तारखांना राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुणे : राज्यात एकीकडे कोरोना काही जाण्याचं नाव घेत नाही तर दुसरीकडे हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहेत. यामुळे राज्यावर पुन्हा एकदा हवामानी संकट असणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. (weather forecast to be cloudy in the maharashtra pune vidarbha and marathwada from February 1 to 5 february)
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे याचा थंडीवर परिणाम होईल. हवामानातील या बदलामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 4 आणि 5 फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहणार शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे घाटमाथ्यासह पुण्यात 1 फेब्रुवारी ते 5 तारेखपर्यंत वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. खरंतर, आता बदलत्या हवामानाविषयी बोलायचं झालं तर गेल्या 6 महिन्यापासून वारंवार हवामानात बदल होत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं वातावरण तयार झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हवामानावर होतो. यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांवरही या अवकाळी पावसाचं सावट आहे.
कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. (weather forecast to be cloudy in the maharashtra pune vidarbha and marathwada from February 1 to 5 february)
संबंधित बातम्या –
Weather Alert : राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
Weather Alert : दिल्ली गारठली, महाराष्ट्र कुडकुडणार? काय आहे हवामानाच अंदाज
Weather Alert : मुंबई, पुण्यात थंडी वाढणार तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांत पावसाची शक्यता
(weather forecast to be cloudy in the Maharashtra pune vidarbha and Marathwada from February 1 to 5 february)