Weather Report : राज्यात धुवांधार पावसाची हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
विदर्भात हवामान खात्याने गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता. तो आज मेळघाटात खरा ठरला अचानकपणे चिखलदरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला.
मुंबई : हवामानातील वारंवारच्या बदलांमुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा इथे सांयकाळी तुफान गारपीट झाली. विदर्भात हवामान खात्याने गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता. तो आज मेळघाटात खरा ठरला अचानकपणे चिखलदरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तर या ठिकाणी गारपीट देखील झाली. (Weather Report heavy rain in madhya maharashtra vidarbha maharashtra rain update imd)
चिखलदरा इथल्या पंचबोल पाईटवर गारांचा खच साचला होता. त्यामुळे काही वेळातच रस्त्यावर झाडावर गारा पडल्याने या ठिकाणी काश्मीरसारखं वातावरण पहायला मिळालं. सध्या कोरोनामुळे मेळघाटात पर्यटकांची गर्दी कमी आहे. मात्र, आज या ठिकाणी झालेली गारपिटी मोजक्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरली आहे.
नांदेडमध्ये पावसाची हजेरी
नांदेडमध्येही गुरुवारी रात्री उशिरा हलका स्वरूपाचा पाऊस झाला. रिमझिम स्वरूपाच्या पावसाने गव्हू, हरभरा या पिकांचे नुकसान झालं आहे. हवामान खात्याने या पावसाचा इशारा आधीच दिला होता. दरम्यान, पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
हिंगोलीमध्ये पावसाचा कहर
हिंगीलो जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापून टाकलेल्या गहू, हरबरा पिकांसह इतर पिकांच ही मोठं नुकसान झालं आहे.
काय म्हणाले हवामानतज्ज्ञ?
महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पुढील चार दिवस वातावरणात मोठा बदल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी tv9 शी बोलताना वातावरण बदलाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मध्य भारतातील वातावरण बदलाचा महाराहस्त्राच्या आतील भागात अधिक परिणाम होईल. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये पुढील चार दिवस पाऊस आणि गारपीट होईल. मुंबई आणि कोकण परिसरात पावसाची शक्यता नाही.
मुंबईत हंगामी तापमान असेल. गेल्या आठवड्यात मुंबईचा पारा 38 अंशांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र आता तशी तापमानवाढ होणार नाही. तापमान सरासरीच्या पातळीवर असेल, असे होशाळीकर यांनी tv9 शी बोलताना सांगितले.
पुढील चार दिवस वातावरणात बदल
विदर्भ मराठवाडा भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिसरात दिवसा ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आहे, तर उन्हाचा पारा घसरला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून मध्य प्रदेशातील विशेषतः पूर्व मध्य प्रदेशात अवकाळी पावसाला अनुकूल स्वरूपाचे वातावरण झाले आहे.
या विस्तारीत सिस्टीममुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती क्षेत्रात ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या तापमानात किंचित घट, संध्याकाळी वादळ, गडगडाट आणि पावसाची हजेरी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील चार दिवस वातावरण बदल दिसून येणार आहे. (Weather Report heavy rain in madhya maharashtra vidarbha maharashtra rain update imd)
संबंधित बातम्या –
Weather Alert : आज राज्यावर पावसाळी संकट, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
(Weather Report heavy rain in madhya maharashtra vidarbha maharashtra rain update imd)