Weather report Maharashtra : मुंबईत मार्चमधील विक्रमी तापमान, थंडी-ऊन-वाऱ्याने रत्नागिरीकर कन्फ्युज
Weather forecast Today : मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भात सूर्यनारायण आग ओकू लागला आहे. अकोल्यात तब्बल 39 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
weather report maharashtra मुंबई : मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भात सूर्यनारायण आग ओकू लागला आहे. अकोल्यात तब्बल 39 अंश तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत तर सध्या विचित्र तापमान पाहायला (Weather report today ) मिळत आहे. सकाळी धुके आणि थंडी, तर दुपारी उन्हाच्या झळा असं वातावरण सध्या रत्नागिरीत आहे. भर दुपारी रत्नागिरीकर (Ratnagiri Konkan Weather) सध्या उन्हाच्या तडाख्याने होरपळत आहेत. गेल्या पाच दिवसात तब्बल दोन वेळा रत्नागिरीचा तापमानाचा पारा 37 अंशाच्यावर पोहोचला होता. या उन्हाच्या तडाख्याचा परिणाम आर्द्रतेवर सुद्धा होत आहे. विशेष म्हणजे या उन्हाचा तडाखा फळांचा राजा अर्थात हापूसला बसतोय. कारण या उन्हांच्या झळांमुळे हापूस होरपळतोय. आंबा डागाळतोय. तापमान वाढीचीही परिस्थिती पुढील पाच दिवस कायम रहाणार आहे. (Weather report today mumbai maharashtra ratnagiri konkan 06 march 2021 Weather forecast)
मुंबईत पारा वाढला
मुंबईकरही घामघूम होत आहेत. मुंबईचा पारा दोन दिवसापूर्वी 38 अंशावर पोहोचला (Mumbai weather forecast) होता. सर्वसामान्य तापमानापेक्षा हे तब्बल 5 अंश जास्त तापमान असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, 4 मार्चला 38.1°C इतक्या तापमानाची नोंद झाली. सामान्यता मुंबईत मार्चमध्ये तापमानाचा पारा 32 अंशाच्या आसपास असतो. मार्चच्या पहिल्या आठवड्यात 30-31 अंशापर्यंत पारा राहतो. मात्र यंदा याच पाऱ्याने विक्रमी नोंद केली आहे. पहिल्या आठवड्यात मुंबईतील तापमान सरासरी 36.5°C इतकं नोंदलं गेलं. 2013 नंतर मुंबईतील पारा मार्चमध्ये 37 अंशापर्यंत पोहोचला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? पाहा
Tmax at some of the places in statr today 5 Mar: Vidarbha is at 39 Deg … Aurangabad 36.2 Parbhani 37.2 Malegaon 37.6 Pune 36.1 Slp 37.4 Thane 37 Sangli 36.2 SCZ 37.3 Jalna 35.6 Jeur 37 Nasik 36.3 Jalgaon 38.5 Satara 35.7 pic.twitter.com/V3rAuNzhsn
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 5, 2021
दिल्लीतही तापमान वाढलं
तिकडे राजधानी दिल्लीतही पारा (Delhi weather report) वाढण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसापूर्वी इथे 33.9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यातील सरासरी तापमानापेक्षा हे तब्बल 7 अंशांनी जास्त आहे.
From Last week of Feb. 2021 Mumbai temperatures are rising .. Maximum Reached to 38.1 Deg. C on 4th March 2021. pic.twitter.com/RLO5bzzZKw
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 5, 2021
मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात सूर्यनारायणाने आग ओकली
मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा पाहायला मिळाला. दुपाराच्या सुमारास तर उन्हाचा पारा इतका चढलेला होता की उन्हाचे चटके बसू लागलेले होते. फेब्रुवारी आणि थोडीशी थंडी सरल्यापासून राज्यात आज उन्हाचा कहर पाहायला मिळाला.
VIDEO :
संबंधित बातम्या
Weather Update : राज्यभरात उन्हाचा तडाखा, जळगावात सर्वाधिक तापमान, वाचा कुठे किती तापमान?