Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यासह राज्यात ‘या’ भागांमध्ये 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.

पुण्यासह राज्यात 'या' भागांमध्ये 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 7:09 AM

पुणे : पुणे शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून तापमानात (Temperature) सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने (Meteorological Department) पुढील दोन दिवस शहर परिसरात पावसाची शक्यता (rain alert) वर्तवली आहे. खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली पण 12 नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली. यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी आणि खासकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Weather Update heavy rain alert in 48 hours in Pune Central Maharashtra and Vidarbha by Meteorological Department)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील 48 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल.

या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाले. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही नागरिकांनी गर्मीचा सामना करावा लागतो.

दरम्यान, पुण्यासह, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे या शहरांमध्येही थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पुढील दोन दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. (Weather Update heavy rain alert in 48 hours in Pune Central Maharashtra and Vidarbha by Meteorological Department)

दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवावा अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहे. राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे तर दुसरीकडे दिवाळीचा उत्साह आहे. अशात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दिवाळीमध्ये जागोजागी विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे विजेचे खांब आणि कुठल्याही लोखंडाला स्पर्श करताना सावधान. पावसाच्या परिस्थिती यामुळे नुकसान होऊ शकतं. जीवालाही धोका असून शकतो.

इतर बातम्या –

Weather Update : मुंबईसह राज्यभर थंडीची लाट, ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

विदर्भात थंडीचा कडाका, गेल्या 24 तासात तापमानात घसरण, रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

(Weather Update heavy rain alert in 48 hours in Pune Central Maharashtra and Vidarbha by Meteorological Department)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.