Weather Update: मान्सून सक्रिय होतोय; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल याची माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्रतवण्यात आला आहे.
Nowcast Warning issued at 1000 Hrs 16/08/2021:
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of #Mumbai, #Thane, #Palghar, #Raigad, #Ratnagiri, #Sindhudurg during next 3 hours.
-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
मराठवाड्यातही पावासाचा अंदाज
हवामान विभागानं मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली , जालना जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलाय.
‘या’ जिल्ह्यांना यलो अॅलर्ट
सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
?? Severe weather warnings issued by IMD for Mah for 15-19 Aug, 2021. As on day there is no warning for 19 Aug. D1 parts of Konkan, Madhy Mah heavy rainfall at isol places. D2-D4 heavy rainfall & TS warnings in diff districts as shown below. Pl see IMD website for details. pic.twitter.com/45QxyERfHf
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 15, 2021
17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अॅलर्ट
हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस
सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
इतर बातम्या:
परभणीच्या शेतकऱ्यांची पुण्यात धडक, पीक विमा प्रश्नी आक्रमक, 3 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी
शास्त्रीय नियोजनाला बीज प्रक्रियेची साथ द्या, तज्ज्ञांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
Weather Update IMD predicted intense rainfall in various district of Maharashtra