MumbaiRains : मुंबईसह राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात, पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याकडून इशारा
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आजही सकाळपासूनच मुंबई (Mumabi), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पालघर (Palghar), वसई-विरार (Vasai-Virar), नाशिक (Nashik) अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. इतकंच नाही तर पुढच्या 24 तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (Weather update mumbai rain maharashtra rain udpate thane palghar navi mumbai pune nashik rain news)
मुंबईमध्येही ढगाळ वातावरण झालं असून अनेक उपनगरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. नवी मुंबईमध्येही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांना कोरोनाच्या संकटात आणखी त्रास सहन करावा लागला. मुंबईतही वसई-विरार नालासोपाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाच्या सरी सुरूच आहे.
आभाळ पूर्णपणे भरलेलं असून हावेत प्रचंड गारवा पसरला आहे. भिवंडीतही पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मंडई बाजार पेठेत सकाळीपासून पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. खरंतर, या अवकाळी रिमझिम पावसाने साथीचे आजार बाळावण्याची शक्यता वाढली आहे.
Latest satellite image indicating cloudyness over North Konkan region. Light to mod rains expected to continue for next 3,4 hrs. There could be traffic jams, poor visibility.. Drive slowly as roads could be wet. Its raining Mumbai Thane around too. pic.twitter.com/tT8KLchfCn
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 14, 2020
नवी मुंबई, पनवेल पाऊस आणि ढगाळ वातावरण
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील हवानात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पनवेल, नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पावसाच्या रिमझिम सरी सुरू आहेत. तर आता पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. खरंतर, हवामान विभागानेही 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविली होती.
पालघरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही सकाळी 7 वाजल्यापासून पालघर शहरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेत गारवा पसरला आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो.
Nashik Bhivandi Road today morning??? Take care of slippery roads.. ?? Poor visibility…Drive slow in Mumbai and Thane too please. Its raining with mod intensity. pic.twitter.com/IIleCE1UkH
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 14, 2020
नाशिकमध्ये रिमझिम सुरू
सलग चौथ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. बेमोसमी पावसामुळे हवामानात बद्दल झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने थंडीत देखील वाढ झाली आहे. (Weather update mumbai rain maharashtra rain udpate thane palghar navi mumbai pune nashik rain news)
इतर बातम्या –
महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा
Washim | वाशिममध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस, शेतकरी चिंतेत
(Weather update mumbai rain maharashtra rain udpate thane palghar navi mumbai pune nashik rain news)