बलसागर भारत होवोः सुवर्ण महोत्सवी मशालचे नाशिकमध्ये जंगी स्वागत!

देशभरात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जंगी कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्त निघालेल्या विजयी मशालचे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवारी भव्य स्वागत करण्यात आले.

बलसागर भारत होवोः सुवर्ण महोत्सवी मशालचे नाशिकमध्ये जंगी स्वागत!
नाशिकमध्ये सुवर्णमहोत्सवी विजय मशालचे जोरदार स्वागत करण्यात आले.
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 11:42 AM

नाशिकः देशभरात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जंगी कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्त निघालेल्या विजयी मशालचे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवारी भव्य स्वागत करण्यात आले.

डिसेंबर 1971 मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली. या विजयाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात स्वर्णिम विजय वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक येथील तोफखाना केंद्रात येत्या नऊ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 1 नोव्हेंबर रोजी तोफखाना केंद्र ते पांडवलेणी पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. 2 नोव्हेंबर रोजी ओझर एअरफोर्स रॅली काढली. आज गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी भोसला स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विजयी मशालचे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. भोसला मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी संचलन करत विजयी मशालीला मानवंदना दिली. यावेळी ए. बी. बी. सर्कल, भोसला भवन, टी. ए. कुलकर्णी सर्कल, कॉलेज रोड असे संचलन करत गंगापूररोडवरील शहीद स्मारक चौकात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मानवंदना दिली. दरम्यान, उद्या 5 नोव्हेंबर रोजी पोलीस अकॅडमीत कार्यक्रम होईल, तर 6 नोव्हेंबर रोजी योद्ध्यांचा गौरव केला जाणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी आर्टिलरी म्युझियम येथे सांस्कृतिक कार्यक्रम, तर 9 नोव्हेंबर रोजी विजयी मशाल नाशिकहून महूकडे रवाना होणार आहे.

ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांच्या तसेच शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने विभागीय आणि जिल्हास्तरावरून प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महांसचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या आहेत. डॉ. दिलीप पांढरेपट्टे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर लेख लिहिणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर आधारित पुस्तिका अथवा कॉफीटेबल बुक तयार करण्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करण्यात यावी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांबाबत लेख लिहून प्रसिद्धी देताना जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनांचे सहकार्य घ्यावे. जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत काही घटना, आंदोलने, मेळावे अथवा लढे उभारले असतील त्याविषयीचा इतिहास जाणून घेवून त्याबाबत देखील लेखांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्याचे नियोजन ऑगस्ट 2023 पर्यंत करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. (Welcome to Golden Jubilee Vijay Mashal in Nashik)

इतर बातम्याः

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त

दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.