प्रख्यात हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर दसककर यांचे नाशिकमध्ये निधन

नाशिक येथील प्रख्यात आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज गुरुवारी सकाळी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रख्यात हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर दसककर यांचे नाशिकमध्ये निधन
प्रख्यात हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर दसककर.
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 4:41 PM

नाशिकः नाशिक येथील प्रख्यात आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज गुरुवारी सकाळी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

पंडित दसककर यांचे संगीत शिक्षण काका पंडित एकनाथ दसककर आणि ग्वालियर घराण्याचे पंडित राजाभैया पुंछवाले यांच्याकडे झाले. संगीत शिक्षक आणि हार्मोनियम वादक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती होती. जेव्हा महिनांनी गाणे म्हणणे आणि शिकणे वर्ज्य समजले जायचे त्या काळात त्यांनी महिलांच्या गीत गायनासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाची स्थापना केली. या मंडळातून अनेक महिलांना संगीत शिक्षण दिले. संपूर्ण हरिपाठाला त्यांनी वेगवेगळ्या रागांमध्ये संगीतबद्ध केले. दसककर यांनी अनेक भजने, रागदारीतील बंदिशी, तराणे यांना अद्वितीय चाली दिल्या. त्यांना अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी गौरवले. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नर्तक पंडित बिरजू महाराजांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यांनी अनेक शिष्य घडवले. सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर यांचे ते वडील होत.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

पंडित दसककर यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही पंडित दसककर यांना श्रद्धांजली वाहिली. पालकमंत्री भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, ‘नाशिकमधील ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही अतिशय दुःखद बातमी आहे. नाशिकमधील जेष्ठ संगीत शिक्षक , तसेच वादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्या काळात महिलांनी गाणे म्हणणे किंवा शिकणे व्यर्ज होते. त्या काळात त्यांनी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाची स्थापना करून अनेक महिलांना संगीत शिक्षण दिले. संपूर्ण हरिपाठाला रागदारीतील वैविध्यपूर्ण रागांमध्ये संगीतबद्ध केले. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मी व माझे कुटुंबीय दसककर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच पार्थना करतो,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (Well known harmonium player Pandit Prabhakar Dasakkar passed away in Nashik)

इतर बातम्याः

हवामानाचे विचित्र चित्र; राज्यात कुठे थंडी अन् कुठे होणार पाऊस, निफाड ठंडा ठंडा Cool Cool

नाशिकच्या HDFC बँकेत 1 कोटी 4 लाख 45 हजारांचा घोटाळा; 31 शेतकऱ्यांना गंडा, पोलिसांची भूमिका संशयास्पद

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...