गोर्‍हे, कायंदे, बजोरिया यांच्या निलंबनाचे काय? मुंबई महापालिकेची निवडणूक कुणामुळे रखडली? अनिल परब यांची जोरदार बॅटिंग

7 मार्च 2022 रोजी पालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारनेच केलेल्या सर्व्हेमध्ये निवडणुकीत यश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने...

गोर्‍हे, कायंदे, बजोरिया यांच्या निलंबनाचे काय? मुंबई महापालिकेची निवडणूक कुणामुळे रखडली? अनिल परब यांची जोरदार बॅटिंग
ANIL PARAB
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 10:17 PM

मुंबई । 3 ऑगस्ट 2023 : मुंबई महापालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली. पण, न्यायालयाचा मुद्दा पुढे करून निवडणूक घेण्यास सरकार टाळाटाळ करत आहे असा आरोप करतानाच उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यासह मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांच्या अपात्रतेच्या नोटीसचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला. तसेच, सभागृहाला खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडत विधान परिषदेत जोरदार बॅटिंग केली.

अंतिम आठ्वड्यावरील प्रस्तावावर बोलताना अनिल परब यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) न्यायालयात गेल्यामुळे महापालिका निवडणूक रखडल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या आरोपांचे खंडन करताना शिंदे आणि भाजप यांनी शिवसेनेची धास्ती घेतली आहे त्यामुळेच सरकार निवडणूक घेण्याच हिंमत करत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

हे सुद्धा वाचा

लोकसंख्या वाढीमुळे प्रशासकीय सुविधेसाठी महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिंदे भाजप सरकारने हा निर्णय बदलला. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुप्रीम कोर्टात गेली.

परंतु, सुप्रीम कोर्टाने 227 वॉर्डनुसार निवडणुका घेण्यास कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच शिवसेनेनेही निवडणुका घेण्यास विरोधही केलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या हा विरोधकांचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.

7 मार्च 2022 रोजी पालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारनेच केलेल्या सर्व्हेमध्ये निवडणुकीत यश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही निवडणूक टाळली जात आहे का, असा सवाल त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती ही राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांबाबत आहे असे स्पष्ट करून या प्रकरणातही सरकार वारंवार वेळ वाढवून मागत असल्यानेच या निवडणुका रखडल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या अपात्रेतचा निर्णय कधी होणार?

उपसभापती नीलम गोर्‍हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण, त्यांच्याविरोधात दिलेल्या अपात्रतेच्या नोटीशीचे काय झाले? सरकारने जे आश्वासन दिले त्यानुसार समितीची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पालिका आयुक्त, मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात हक्कभंग

मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा विभागाकडून बसवण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स मशीन्स निविदा प्रक्रियेतील घोटाळा गेल्या अधिवेशनात मांडण्यात आला होता. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात परब यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.