एक टेबल दोन ग्लास, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं? खळबळजनक Video व्हायरल
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंत संतोष देशमुख यांच 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती, या घटनेच्या आठ दिवसांनंतर आता एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंत संतोष देशमुख यांच 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं, केज आणि मस्साजोग येथे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. दरम्यान या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत कुणीही माहिती दिलेली नाही. टीव्ही9 मराठी सुद्धा या व्हिडीओची सत्यता आणि कालावधीबाबतची पुष्टी करत नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात देशमुख यांच्या कुटुंबानं पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता आठ दिवस उलटले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चार आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान कुटुंबाने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्यानंतर या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आलं, त्यांचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.
या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेटले होते. दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. मात्र हा व्हिडीओ गुन्हा घडण्यापूर्वीचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
संतोष देशमुख यांची गाडी आडवून सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरन केलं होतं, त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली होती, नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चार आरोपी अद्यापही फरार आहेत.