भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका; दीपक केसरकर यांचा सल्ला काय?
ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालना-अंबड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात प्रचंड टीका केली आहे. सरकारला त्यांनी धारेवर धरीत जाब विचारला आहे. त्यावर मंत्री दिपक केसरकर यांनी भुजबळ यांना सल्ला देत एकदा सरकारने आश्वासन दिल्यानंतर अशी वक्तवे करणे बंद करावे असे म्हटले आहे.

गिरीश गायकवाड, मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी जालनाच्या ओबीसी एल्गार सभेत शेलक्या शब्दात टिका केली आहे. त्यास मनोज जरांगे यांनी जशास तशी टीका करून प्रत्युत्तर दिले आहे. स्वत:च्या सरकारला घरचा आहेर देत भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर वेळीच कारवाई न केल्याने त्यांची हिमंत वाढल्याची टिका केली. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे. त्यामुळे कोणाच्याही आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोणीही वेगवेगळी विधाने करण्याची गरज नाही. आता हे सगळं थांबवण महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचा सल्ला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.
ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालना-अंबड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात प्रचंड टीका केली आहे. सरकारला त्यांनी धारेवर धरीत जाब विचारला आहे. त्यावर विचारता मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. आता कोणी वेगवेगळी विधाने करण्याची गरज नाही. ते सगळे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. परंतू एकदा सरकारने सांगितले आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. तेव्हा आता हे सगळे थांबविणे महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.
श्रेय घेणे योग्य नाही
कोणाही व्यक्तीविरोधात काही आक्षेप असतील तर त्याविरोधात पोलिसात तक्रार करायला हवी अशा प्रकारे कोणावरीही हल्ला करणे योग्य नाही असे नामदेव जाधव हल्ला प्रकरणी प्रतिक्रीया देताना सांगितले. आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्या प्रकरणावर बोलताना केसरकर यांनी काम पूर्ण झाल्यानंतर आपण केवळ फिती कापायच्या हे बंद केले पाहीजे. रस्त्यावर सुरक्षा पट्टे रंगवायचे बाकी होते. फक्त श्रेय हे बरोबर नाही अशी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना मिठ्या
तुम्ही मंत्रालयात रोज गेला असता तर बाळासाहेबांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी मणिशंकर विरोधात मुंबई बंद केली आणि तुम्ही सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना मिठ्या मारता, हिंदु धर्माचा अपमान करणाऱ्या स्टॅलिनच्या मुलाला भेटता. कारण स्टॅलिन आपल्या प्रचाराला यावे असे आदित्य ठाकरेंना वाटते इंडीया आघाडीच्या नेते आले त्यांना घेऊन तुम्ही बाळासाहेबाच्या स्मृतीस्थळावर गेलात का ? एक शिवसैनिक गेला तर तुम्ही घोषणाबाजी करता अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.