हरियाणात जे झालं तसंच आम्ही महाराष्ट्रात करणार, काय म्हणाले अजित पवार
अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्याआधी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. हरियाणातील निकालावर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की हरियाणात जे झालं तसंच आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज पत्रकार परिषद झाली. त्याआधी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, कधीही ४० हजार कोटी कंत्राटदाराचे देणं राहत नाही. उगाच आकडा घ्यायचा आणि वाजवत राह्यचं योग्य नाही. दरवर्षी कामे काढतो. त्याचा पैसा देतो. काम करून घेतलं तर पैसे द्यावेच लागतात. निवडणुका आल्या त्या त्यावेळी विरोधी पक्षाने आरोप केले. सत्ताधाऱ्यांनी कर्ज काढलं असा आरोप केला. तुम्ही राज्य कर्ता असला तरी ३ टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नाही. केरळमध्ये असं झालं. ते सुप्रीम कोर्टात गेले. त्यावेळी केंद्राने सर्वांना नियम सारखाच असल्याचं सांगितलं.
आमचे ४० ते ४२ सिटींग आहे. समोरच्या बाजूला तेवढ्या जागा रिक्त आहे. त्यामुळे त्यांना संधी आहे. आमच्याकडे १२ ते १५ रिक्त आहे. जेव्हा आम्ही बसू तेव्हा आम्हाला कळेल. त्यांनी आयाराम गयारामांबद्दल काय विधान केलं होतं. आता ते काय बोलत आहेत, कुणाला घेत आहेत हे पाहिलं असेल. शेवटी जनता जनार्दन आणि नेतेही महत्त्वाचे असते. आम्ही नेत्यांना घेण्याऐवजी सिने अभिनेत्यांपासून सुरुवात केली आहे.
बैठकीतून का निघून गेले?
अजित पवार म्हणाले की, ‘१० वाजता कॅबिनेट होती. पहिला कार्यक्रम अहमदपूरला होता. मला कॅन्सल करायचा होता. मला फोन आला. म्हटलं येणार नाही. ते म्हणाले हारफुले काही देणार नाही. शेतकऱ्यांचा मेळावा आहे. मी १० वाजता तिथे पोहोचलो. साडे बाराला उठलो. १ला टेकऑफ घेतला. आणि तो कार्यक्रम केला. त्यापेक्षा काही नाही. एखाद्याला विमान पकडायचं असेल तर माणूस जातो ना. त्यापेक्षा काही नाही. पहिले सर्वात महत्त्वाचे विषय घेतले गेले. कोणते विषय हे मला माहीत होते. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नाही. हे जबाबदारीने सांगतो. नाही बाबा धुसफूस अजिबात नाही. कुठलं चित्र नाही. ऑल इज वेल.’
‘आमच्या पक्षात जे काही आहे, ज्यांना जे योग्य वाटतं, त्यांची जी भूमिका आहे, ती मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मोकळं वातावरण आहे. पण पक्षाची भूमिका प्रवक्ते जी भूमिका मांडतील त्याला आम्ही सहमत राहू. हरियाणात दलित दुरावले होते. त्यांना सोबत घेतलं. तसंच आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत. संविधान बदलण्याचा नरेटिव्ह करण्यात आला. हा नरेटिव्ह आता आम्ही बदलत आहोत. आम्ही मायनॉरिटीसाठीचे सर्वाधिक निर्णय घेतले.’