महाराष्ट्राच्या राजकारणातील आतली बातमी, विधानसभेसाठी कुणाचा काय फॉर्म्युला ठरला?

महायुती आणि मविआत फॉर्म्युल्यावरुन विविध आकडे समोर येत आहेत. मविआत ठाकरे आणि पवारांचं एकमत झालं असून आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष आहे. तर दुसरीकडे महायुतीतही जागांवरुन दावेदारी सुरु झालीय.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आतली बातमी, विधानसभेसाठी कुणाचा काय फॉर्म्युला ठरला?
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 9:11 PM

विधानसभेला अवघे दीड ते दोन महिन्यांचा काळ राहिल्यामुळे जागावाटपाची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मविआत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागावाटपाच्या सूत्राबद्दल एकमत झालं आहे आणि त्या फॉर्म्युल्यावर काँग्रेसची भूमिका काय समोर येते? यावर पुढचं चित्र अवलंबून असेल. मविआचे नेते माध्यमांसमोर फॉर्म्युल्याच्या चर्चा नाकारत असले, तरी सूत्रांनुसार मविआसाठी एकूण 3 फॉर्म्युले ठरले आहेत. पहिला फॉर्म्युला काँग्रेस 96, ठाकरेंची शिवसेना 96 आणि शरद पवारांची राष्ट्रवादीनं 96 जागा लढाव्यात. दुसरा फॉर्म्युला काँग्रेसनं 96 ते 100 जागांवर लढाव्यात, ठाकरेंनी सुद्दा 96 ते 100 जागा, आणि पवारांना 90 ते 96 जागा लढाव्यात.

तिसरा फॉर्म्युलात काँग्रेस आणि ठाकरेंनी प्रत्येकी 100-100 जागांवर लढावं, आणि पवारांनी 88 जागांवर लढावं. या फॉर्म्युलात मविआच्या मित्रपक्षांना काँग्रेस आणि ठाकरेंनी जागा सोडाव्यात, असा फॉर्म्युला चर्चेत होता. मात्र विधानसभेला जो जिंकेल त्याची जागा, हे लोकसभेप्रमाणेच सूत्र असणार आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मविआचे तिन्ही पक्ष 288 जागांची चाचपणी करत असल्याचा दावा केलाय.

संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही २८८ जागांची चाचपणी करत आहोत. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष 288 जागांची चाचपणी करत आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा जागावाटपाचे सूत्र आहे, जो जिंकेल त्याची जागा आहे”, असं संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीशी जोपर्यंत विधानसभेच्या जागेबाबत चर्चा होत नाही तोवर आम्ही बोलणार नाही. ज्या त्या पक्षाची तयारी असणे स्वाभाविक आहे. या प्रश्नावर तिसऱ्या पक्षाने बोलणे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत कधी लोकांना भेटत नाही कधी ग्राउंडवर जात नाहीत. ते 288 पैकी 290 जागा जिंकू शकतात. त्यांचा काही भरोसा नाही. एक वेळ काँग्रेसच्या जागा वाढतील पण उबाठाच्या जागा ह्या विधानसभेमध्ये वाढणार नाहीत. विधानसभेमध्ये काँग्रेस आणि उबाठाची युती होणार नाही. काँग्रेसवाले जागावाटपाबद्दल बोलत सुद्धा नाहीत. शरद पवार जेव्हा खांदा झटकतील तेव्हा हे सगळे पाय खाली दिसतील”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहराच नाही?

दरम्यान, मविआकडून यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा दिला जाणार नाही. निकालानंतर याची चर्चा होईल, असं सांगितलं जातंय. यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होण्याची शक्यता कमी आहे आणि मविआबाबतीतही तीच स्थिती असण्याची चिन्हं आहेत.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. “चेहरा आणि जागावाटप यावर जाहीर चर्चा करता येणार नाही. यावर बंद खोलीत चर्चा करावी लागेल”, असं चव्हाण म्हणाले. खासदार संजय राऊत यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू, की कोणी कुठे किती जागा लढवायच्या आणि जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल असं आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं”, असं राऊत म्हणाले.

2019 चा फॉर्म्युला काय?

2019 च्या विधानसभेत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये 164/124 चा फॉर्म्युला होता. भाजपच्या वाट्याला 164, तर शिवसेना 124 जागा लढली होती. भाजपच्या 164 जागांमध्ये 12 जागा युतीच्या मित्रपक्षांना देण्यात आल्या होत्या. तर आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत 125/125 च्या फॉर्म्युल्यानं लढली. उर्वरित 38 जागा आघाडीच्या मित्रपक्षांना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, फॉर्म्युल्यावर बैठका घेवून मविआनं लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय. लोकसभेत अनेक जागांवर उशिरानं उमेदवार दिल्यामुळे महायुतीला फटका बसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे विधानसभेला महायुतीचाही लवकरच फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.