AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुका पुढं ढकलण्याचं कारण काय, अजित पवार म्हणतात…

भाजपमुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. भाजपच्या नेत्याला एकनाथ शिंदे भेटले तर त्यात काही आश्चर्य नाही. वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही.

निवडणुका पुढं ढकलण्याचं कारण काय, अजित पवार म्हणतात...
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 9:40 PM

पुणे : सप्टेंबरच्या शेवटपर्यंत निवडणुका पुढं ढकलल्या जाणार होत्या. काही जिल्ह्यात परतीचा पाऊस ऑक्टोबरमध्ये पडतो. पण, त्याचा काही फारसा परिणाम मतदानावर होऊ शकत नाही. याबाबत अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत राहिलो असतो, तर निवडणुका लागल्या असत्या. यांना प्रभाग चारचा की, तीनचा असा प्रश्न आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना गट एकत्र निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर काय कौल मिळेल. याबद्दल खात्री नसल्यानं ते निवडणुका पुढं पुढं ढकलतात. अस माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे प्रमुखांनी यासंदर्भातील नोंद घ्यावी. ताबडतोब निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणही अजित पवार यांनी केली.

तपास करण्याचा आग्रह धरेन

पुण्यात कुठल्या भागात घोषणा दिल्या. तत्थ्य आहे की, नाही हे बघेन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब माहिती देईन. कारवाई करण्यासाठी भाग पाडीन. एकनाथ शिंदे यांनाही विनंती करेन. जे घडतंय ही लाजीरवाणी बाब आहे. असं घडता कामा नये. अशा घटना जिथल्या तिथं थांबल्या गेल्या पाहिजेत. यामागचा सूत्रधार कोण आहे. याचा तपास करण्याचा आग्रह मी राज्य सरकारकडं करेन, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

वेगळा अर्थ काढण्यात अर्थ नाही

कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला गेल्यानंतर त्यांना पंतप्रधानांना भेटावं लागतं. गृहमंत्र्यांना, अर्थ, वाणिज्य, वनविभाग किंवा ज्या मंत्रालयाचं काम असेल त्यांना भेटावं लागते. भाजपमुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. भाजपच्या नेत्याला एकनाथ शिंदे भेटले तर त्यात काही आश्चर्य नाही. वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही.

प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार

खंडपीठापुढे लोकशाहीचा महत्त्वाचा मुद्दा पुढं आला आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठांना यासंदर्भातील निर्णय लवकर घ्यावा. उद्धव ठाकरेंना काय विचार मांडायचे ते मांडू द्या. दुसऱ्या मैदानातून एकनाथ शिंदे यांना काय विचार मांडायचे ते मांडू द्या. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपआपली मत मांडण्याचा अधिकार आहे.

आपआपली रणनीती आखू द्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीत होत्या. याबाबत अजित पवार म्हणाले, त्यांना त्यांची रणनीती आखू द्या. आम्ही आमची रणनीती आखण्यासाठी सक्षम आहोत.त्यासंदर्भात काही काळजी करण्याचं कारण नाही. दोघांनी कितीही रणनीती आखली तरी बारामती लोकसभा मतदार संघातला राजा योग्य माणसाला मदतान करेल. गेल्या 30-32 वर्षांचा अनुभव बघता कोण आपला विकास करू शकेल. संसदेत आपले प्रश्न हिमतीनं कोण मांडू शकेल. आपल्या सुखदुःखात कोण सहभागी होऊ शकेल. केवळ राजकारण न करता इतर विषयात कोण आधार देईल. या सगळ्याचा विचार करून मतदार राजा बटन दाबण्याचं काम करेल. याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.