Heavy Rain : देवा तुला शोधू कुठं..! धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंदिरेही पाण्यात, जाणून घ्या काय आहे स्थिती?
धराणातील पाणी क्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. पाणीसाठा वाढतच दरवाजे खुले करुन नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणीपातळी दिवसागणीस वाढ होत आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी ही 30 फूटांपर्यंत पोहचलेली आहे. कृष्णा नदीकाठच्या औदुंबर मधील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे.
मुंबई : राज्यात पावसाने असा काय धुमाकूळ घातला आहे की, त्यामुळे (Crop Damage) पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय अनेक ठिकाणी मनुष्यहानीही झाली आहे एवढेच काय पण या संकटात देवाची (Temple Under Water) मंदिरेही पाण्याखाली आहेत. आतापर्यंत अधिकच्या (Heavy Rain) पावसामुळे खरीप हंगमातील तब्बल 15 लाख हेक्टरावरील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्याअनुशंगाने कृषी विभागाने अहवालही सादर केला आहे. एवढे होऊनही राज्यात पावसाचा कहर सुरु आहे. पावसामुळे घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या असतानाच आता धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने मंदिरेही पाण्यात अशी स्थिती सांगली, बीड आणि कोल्हापुरातील इचलकरंजी तालुक्यात ओढावली आहे. मंदिरे ही पाण्याखाली गेल्याने देवा तुला शोधू कुठं? असेच म्हणण्याची वेळ ही भाविकांवर आलेली आहे. काही ठिकाणी तर देवाची मूर्ती देखील स्थलांतरित करावी लागणार आहे.
पलूस येथील दत्त मंदिरात पाणी
धराणातील पाणी क्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. पाणीसाठा वाढतच दरवाजे खुले करुन नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणीपातळी दिवसागणीस वाढ होत आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी ही 30 फूटांपर्यंत पोहचलेली आहे. कृष्णा नदीकाठच्या औदुंबर मधील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. पाणीपातळीत वाढ झाली तर मात्र, मंदिरातील उत्सव मूर्ती ही हलवावी लागणार असल्याचे पुजारी केदार जोशी यांनी सांगितले आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात पाण्याची आवक ही सुरुच असल्याने ही परस्थिती ओढावली आहे.
गेवराईतील शनी मंदिरालाही पाण्याचा विळखा
बीड जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस बरसलेला असला तरी जायकवाडी धरणातील वाढत्या पाणीपातळीमुळे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना याचा धोका वाढत असला तरी राक्षसभुवन येथील शनी मंदिरालाही पाण्याचा विळखा पडला आहे. राक्षसभुवन हे गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध असे देवस्थान आहे. भाविकांसह परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच जायकवाडीचे दरवाजे दोन वेळा उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात पूर परिस्थिती निर्माण झालीय. सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे गोधा काठच्या 32 गावांना देखील सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
नरसिंह वाडी मंदिर पूर्ण पाण्याखाली
कोल्हापूर सांगली सातारा या आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा पंचगंगेला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीक्षेत्र नरसेवाडी मंदिरामध्ये पाणी आल्यामुळे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्सवमूर्ती वरील सभामंडपामध्ये असणाऱ्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसात पावसाने विश्रांती जरी दिले असले तरी राधानगरी कोयना धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे कोयना व राधानगरी या धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून एन डी आर एफ टीम जिल्हा प्रशासन टीम सज्ज करण्यात आली आहे.
ही बातमी पण वाचा
Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!