पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी संपत्ती किती? याबाबतची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल केलाय. या अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 9:06 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही वाराणसी येथून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता त्यांनी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून माहिती द्यावी लागते. मोदींनी देखील अर्ज दाखल करताना आपल्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. या माहितीनुसार, मोदींच्या संपत्तीत 2014 ते 2019 च्या दरम्यान 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मोदींची सर्वाधिक संपत्ती ही भारतीय स्टेट बँकेत फिक्स्ड डिपॉजिटच्या रुपात आहे. ही फिक्स्ट डिपॉजिट 1.27 कोटी इतक्या रुपयांची आहे. मोदींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ते दरवर्षी किती इनकम टॅक्स भरतात याचीदेखील माहिती दिली आहे.

मोदींच्या उत्पन्नाचं साधन काय?

प्रतिज्ञापत्राच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचं साधन हे त्यांना सरकारकडून मिळणारी सॅलरी आणि त्यांच्या सेविंग्सवर मिळणारा व्याज हे आहे. मोदींनी 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात 3 लाख 33 हजार 178 हजार रुपये इतका इनकम टॅक्स भरला आहे.

मोदींचं गेल्या पाच वर्षांचं उत्पन्न किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पाच वर्षाच्या उत्पन्नाची माहिती देण्यात आलीआहे. प्रतिज्ञापत्रानुसार मोदींची 2018 ते 19 दरम्यानचं उत्पन्न 11 लाख 14 हजार 230 रुपये इतकं होतं. 2019 ते 2020 चं उत्पन्न 17 लाख 20 हजार 760 रुपये इतकं होतं. 2020 ते 2021 चं उत्पन्न 17 लाख 7 हजार 930 रुपये इतकं होतं. 2021-22 चं उत्पन्न 15 लाख 41 हजार 870 इतकं होतं. तर 2022-23 चं उत्पन्न 23 लाख 56 हजार 80 रुपये इतकं दाखवण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर कोणतंही घर किंवा कार नाही. त्यांच्याजवळ 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.