आरोग्य मंत्र्यांना किती टक्के कमिशन मिळतं?; संजय राऊत यांनी सांगितलेला आकडा काय?

माझ्या हातात असतं तर मी संसदेतून वीर सावरकर यांची प्रतिमा काढली असती, असं विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी काढलं आहे. प्रियांक यांच्या या विधानावरून भाजपने राज्यात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर, राऊत यांनीही प्रियांक यांना फटकारलं आहे. प्रियांक यांचे काही चालत नाही. वीर सावरकर यांना देशातील जनतेने उपाधी दिली आहे. भाजपने वीर सावरकर यांना भारत रत्न द्यावा, असं आव्हानच राऊत यांनी केलंय.

आरोग्य मंत्र्यांना किती टक्के कमिशन मिळतं?; संजय राऊत यांनी सांगितलेला आकडा काय?
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 1:56 PM

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 8 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तानाजी सावंत यांना कशी आणि किती टक्केवारी मिळते याचा पर्दाफाशच संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आरोग्य खात्यात पदांचा लिलाव झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा आरोप करून सावंत यांना आव्हानच दिलं आहे.

तानाजी सावंत हे खोटारडे मंत्री आहेत. त्यांना जे प्रश्न आम्ही विचारले त्यावर ते बोलले नाहीत. आरोग्य खात्याली बढत्या त्यांनीच केल्या आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे मी मुख्यमंत्र्यांकडेच देणार आहे. राहुल गटे नावाचा अधिकार कुणाचा आहे हे माहीत आहे. त्याने पैसे गोळा करण्यासाठी नवी मुंबई आणि ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. ते तानाजी सावंत यांना माहीत नाही का?, असा सवाल तानाजी सावंत यांनी केला आहे.

तानाजी सावंत यांना आव्हान

सिव्हील सर्जन, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक आणि सहसंचालक या पदांचा लिलाव झाला नाही का? यावर तानाजी सावंत काही बोलले का? मेडिकल ॲप… हा ॲप… तो ॲप.. मूर्ख समजत आहात का? दोन दिवस थांबा. माझ्या कारमध्ये कागदपत्रे आहेत. आरोग्य मंत्र्यांना दाखवतो काय चाललंय त्यांच्या खात्यात, टेंडर बाजी सुरू आहे. अव्वाच्या सव्वा दराने टेंडर दिली. कुणाला दिली? सर्व माहीत आहे. आरोग्य मंत्र्यांना कसं 20 ते 30 टक्के कमिशन मिळतंय हे सर्व समोर येतंय. ही क्रिस्टल कंपनी कुणाची आहे? 500 कोटीचं टेंडर 550 कोटीला दिलं. कुणाची कंपनी आहे? आरोग्य मंत्र्यांनी जाहीर करावं, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

वाघ की बकरी… तुम्ही कोण ठरवणार?

यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली. बकरा नाहीतर मी वाघ आहे. सोडून गेलेल्यांनी माझ्यावर बोलू नये. पळपुट्यानी माझ्यावर बोलू नये. माझं अख्खं आयुष्य या पक्षात गेलं.वशिवसेनेत गेलं. बकरा नाहीये. तुमच्या सगळ्यांसारखा माझ्या पक्षाशी इमानदार आहे. काम करणारा शिवसैनिक आहे. माझं अख्खं आयुष्य बाळासाहेबांसोबत गेलं आहे. या पक्षात आल्या खाल्ल्या आणि ताट घेऊन निघून गेल्या. ताट, वाट्या पण सोडलं नाही. त्यांनी आमच्यावर बोलू नये. मला बकरा करायचं की शेळी करायचे हे तुम्ही कोण ठरवणार? बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जन्मताच वाघासारखं हृदय दिलं आहे. म्हणून तर आम्ही तुमच्याशी लढतो आहोत, असा हल्लाच त्यांनी चढवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.