PM Modi in Vidarbha : विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पीएम मोदी नेमकं काय बोलले?

PM Modi in Vidarbha : "आम्ही याच वर्षी फ्रान्समध्ये वर्ल्ड स्कीलवर आयोजन झालं. त्यात आम्ही कारागिरांना पाठवलं होतं. या परिषदेत भारताने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आपण ऑलिम्पिकची चर्चा करतो. पण हे महत्त्वाचं आहे" असं पीएम मोदी म्हणाले.

PM Modi in Vidarbha : विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पीएम मोदी नेमकं काय बोलले?
PM Narendra ModiImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 1:57 PM

“विश्वकर्माच्या लाभार्थ्यांनी मोठ्या उद्योग समूहाशी निगडीत व्हावं, हे आमचं लक्ष्य आहे. जो वर्ग आर्थिक प्रगतीत मागे होता. तो जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. सरकारची स्कील मिशन त्यांना सशक्त करत आहे. कौशल्य विकास अभियानाने भारताच्या स्कीलला जगात ओळख निर्माण करून दिली आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “आमचं सरकार आल्यावर, आम्ही वेगळं स्कील मंत्रालय तयार केलं आहे. आम्ही याच वर्षी फ्रान्समध्ये वर्ल्ड स्कीलवर आयोजन झालं. त्यात आम्ही कारागिरांना पाठवलं होतं. या परिषदेत भारताने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आपण ऑलिम्पिकची चर्चा करतो. पण हे महत्त्वाचं आहे” असं पीएम मोदी म्हणाले. विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. ते वर्ध्यामध्ये बोलत होते.

“महाराष्ट्रात मोठी संधी आहे. काँग्रेस आणि नंतर महाआघाडी सरकारने कापसाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद वाढवण्याऐवजी त्यांना खाईत ढकललं. ते केवळ शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण आणि भ्रष्टाचार करत राहिले. समस्याचं समाधान करण्यासाठी फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा टेक्स्टाईलला गती मिळाली. नांदेडमध्ये टेक्स्टाईल पार्क आलं. त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही उद्योग येत नव्हते. आता तोच भाग राज्यातील मोठं औद्योगिक केंद्र होत आहेत” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच व्हिजन काय?

“आम्ही देशभरात सात पीएम मित्र पार्क स्थापन करणार आहोत. आमचं व्हिजन फार्म टू फायबर, फॅब्रिक टू फॅशन, फॅशन टू फॉरेन. म्हणजे विदर्भातील कापासापासून हायकॉलिटी फॅब्रिक बनेल. तसेच इथेच फॅशननुसार कपडे तयार करू. परदेशात ते पाठवू. पीएम मित्र पार्कमुळे 8 ते 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होतील. दुसऱ्या उद्योगांनाही चालना मिळेल” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.