उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार? सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गणितं बदलणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार? सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गणितं बदलणार?
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 11:58 PM

मुंबई : राष्ट्रवादीतल्या नाट्याचा येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी कनेक्शन आहे, असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी केलाय. येत्या 11 तारखेनंतर कधीही कोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्याआधी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल, असं सरोदेंनी म्हटलंय. मात्र जर सत्तासमीकरणं बदलली तर शिंदे आणि ठाकरेंचं काय होणार? हे पाहणंही महत्वाचं आहे. येत्या 15 मे आधी कोणत्याही तारखेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्एषाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. निकाल जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूनं गेला तर फारशा उलथापालथी होणार नाहीत. मात्र जर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निकाल लागला, तर शिंदेंचं काय होणार? हा प्रश्न आहे.

विशेष म्हणजे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या मते 10 तारखेनंतर कधीही निकाल लागू शकतो. पण त्याआधी राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल. कारण निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेला तर राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ शकण्याची चर्चा आहे.

संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात एकवाक्यता?

शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करताच अनेक नेत्यांनी पवारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या. मात्र जे काल पाया पडत होते, त्यापैकी अनेक नेते भाजपात येण्यसाठी इच्छुक असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. एरव्ही राणे आणि राऊतांच्या दाव्यात एकवाक्यता कधी दिसत नाही. पण जवळपास असाच दावा ‘सामना’तून राऊतांनीही केलाय. राऊत म्हणतायत की, जे आज पायाशी पडले, तेच उद्या पाय खेचू शकतात, याची कल्पना शरद पवारांच्या खेळीत असावी.

हे सुद्धा वाचा

शिंदे-ठाकरेंचं काय होणार?

स्वतः एकनाथ शिंदे सध्याच्या घडामोडींवर काही बोलत नाहीयत. मात्र त्यांचे राष्ट्रवादीचा गट फुटण्याचे दावे करतायत. दुसरीकडे जर राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत गेला तर ठाकरेंचं काय होणार? हा सुद्धा प्रश्न आहे. कारण, उद्धव ठाकरेंनी न विचारता दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्यासह अनेक मुद्दे पवारांनी आत्मचरित्रात लिहिले आहेत.

मविआची वज्रमूठ सभा रद्द झालीय. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. अध्यक्षपदावरुन राष्ट्रवादीत राजीनामासत्रही सुरु झालंय. इकडे भाजप नेते आणि कायदामंत्री किरेन रिजीजू विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना भेटले आहेत. थोडक्यात जे येत्या 10 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात घडेल, त्यावरच 2024 मधलं बरचंस चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणून यापुढचे काही दिवस भाजप-राष्ट्रवादीबरोबरच शिंदे आणि ठाकरेंसाठी सर्वाधिक महत्वाचे आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.