पोट सुटलेल्या वकिलाला पाहून अजितदादांनी जोडले हात; स्टेजवर नेमकं काय घडलं?
जरांगे यांच्या उपोषण स्थळी आमचे तहसीलदार काल गेले होते. त्यांचे निवेदन घेऊन तहसीलदाराने सरकारकडे पाठवले आहे. काय मागण्या आहेत,काय निवेदन आहे हे पाहून जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या मिश्कील स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीरपणे अनेकांची खिल्ली उडविली आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या शेरेबाजीतून कोणीही चुकलेले नाही. अजितदादा पवार यांनी आज एका कार्यक्रमात अशीच एका वकीलाची खिल्ली उडविली, त्यामुळे संबंधित वकील तर खजील झालाच शिवाय उपस्थितीतांमध्ये देखील हशा उडाला.
इंदापूरात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रम झाला. इंदापूर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहीते डेरे आदी उपस्थितीत होते. यावेळी एक तब्येतीन वजनदार असलेले वकील स्वागतासाठी व्यासपीठावर आल्यानंतर अजितदादा त्यांच्याकडे पाहातच राहिले आणि व्यासपीठावरील उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले आणि अजित पवार यांनी त्या पोट सुटलेल्या वकिलांना हात जोडले, त्यानंतर पुन्हा उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत आत्ता एक छोटीशी बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोकसंख्या जास्त असल्याने नवीन कोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.




GBS आजारात मोठे बिल होत आहे
पिंपरी- चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये जीबीएसच्या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये देखील मोफत उपचार देणार आहोत. काही ठिकाणी औषधे महाग मिळत आहेत. नागरिकांचा आरोग्य चांगले ठेवणे ही राज्य सरकारची देखील जबाबदारी आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटसाठी ससूनमध्ये देखील मोफत उपचार सुरू करण्याचा निर्णय उद्या मुंबईत गेल्यावर चर्चा करून घेणार आहे.
पुणे शहरातील दूषित पाणी
पुण्यातील दूषित पाण्याबाबत दोन्ही आयुक्तांशी बोलणे झाले आहे. पाणी पूर्णपणे उकळून प्यायचा सल्ला महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. नरहरी झिरवल यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दर मंगळवारी आमची बैठक असते त्या बैठकीत आपण नरहरी झिरवल यांना विचारुन पाहाणार आहोत. त्यांनी असं वक्तव्य केले असेल तर ते योग्य नाही. त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झाला आहे ते बघू असेही अजित पवार यांनी सांगितले.
चांदेरे प्रकरणात तक्रार केली तर कारवाई
पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर बोलताना जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कुणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही, त्यांना फोन केला होता त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे की जो प्रकार झाला आहे तो मला आवडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.