Disha Salian Case : ‘नारायण राणे बोलतायत म्हणजे…’, दिशा सालियान प्रकरणात महाराष्ट्रातील मोठ्या भाजपा नेत्याच वक्तव्य
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक खुलासे केले. त्यावर आज महाराष्ट्रातील एका मोठ्या भाजप नेत्याने वक्तव्य केलं आहे.

पाच वर्षानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. दिशा सालियानचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियानचा मृत्यू अपघात नसून हत्या आहे असं त्यांनी म्हटलंय. या प्रकरणात त्यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल संशय निर्माण करण्यात येतोय. काल खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गौप्यस्फोट केले.
दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दोनवेळा फोन येऊन गेल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत. मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये. असं वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला” असा दावा नारायण राणे यांनी केला.
‘पण ते जेव्हा सांगतायत…’
नारायण राणे यांच्या या दाव्यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राणसाहेब सांगतायत, त्यांचं काय बोलणं झालय हे मी सांगू शकत नाही. पण ते जेव्हा सांगतायत, मला फोन केला होता, आता या बाबत मी अधिक बोलणं योग्य नाही. पण ते सांगतायत तर त्यात तथ्य असेल” असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले. ते नाशिकमध्ये मीडियाशी बोलत होते. गिरीश महाजन हे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत.
सुशांत सिंह राजपूत क्लोजर रिपोर्टवर म्हणाले….
दिशा सालियान प्रकरण एकीकडे असताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात क्लोजर रिपोर्ट आला आहे. सुशांत सिंह आत्महत्या केल्याच क्लोजर रिपोर्टमुळे स्पष्ट झालय. या पत्रकारांच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले की, “मला वाटतं चौकशी सुरु आहे. चौकशी अंती येईल तो त्या ठिकाणी निर्णय होईल. आज कोर्टात, उच्च न्यायालयात पालकांनी याचिका दाखल केलेली आहे. त्या संदर्भात कोर्ट पुढे काय निर्णय घेतं, काय नाही, मला वाटतं हा सगळा विषय आता न्याय प्रविष्ट झालेला आहे. पुढे काय कारवाई होईल, ती नियमाप्रमाणे होईल”