AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्जाधीश शहरांच्या यादीत मुंबईचे नाव; अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सर्वात जास्त अब्जाधीश राहतात

बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सर्वात जास्त अब्जाधीश राहतात. येथे एकूण 106 व्यक्ती अब्जाधीश आहेत. या यादीत मुंबईचे स्थान 8 व्या क्रमांकावर आहे.

अब्जाधीश शहरांच्या यादीत मुंबईचे नाव; अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सर्वात जास्त अब्जाधीश राहतात
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 7:11 PM

फोर्ब्स या (Forbes Magazine) बिझनेस मॅगझीनतर्फे दरवर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींची नावे जाहीर करण्यात येतात. त्यासह फोर्ब्सद्वारे त्या शहरांच्या नावांची यादीही जाहीर केली जाते, जिथे सर्वाधिक अब्जाधीश (More billionaires) राहतात. त्या शहरांमध्ये आलिशान आयुष्य जगतात. फोर्ब्सने 2022 सालची यादीही जाहीर केली असून अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचा यात पहिला क्रमांक लागतो. न्यूयॉर्कमध्ये (New York 1st) तब्बल 106 अब्जाधीश राहतात. तर 10 व्या क्रमांकावर दक्षिण कोरिआतील सोल हे शहर आहे. तेथे 38 अब्जाधीश राहतात. भारतातील एकमेव शहराचा या यादीत समावेश आहे. भारताची आर्थिक राजधानी असणारी मुंबई (Mumbai is on 8 number) या यादीत आठव्या स्थानी आहे. मुंबईमध्ये 51 अब्जाधीश राहतात, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. जगभरातील अनेक शहरांचा या यादीत समावेश असून दरवर्षी यातील नावे बदलत असतात. मात्र यंदा पहिल्या स्थानावर आहे, न्यूयॉर्क शहर.

जाणून घेऊया जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहणाऱ्या शहरांची नावे

  • 1) वर नमूद केल्याप्रमाणे फोर्ब्सच्या या यादीत पहिला क्रमांक आहे अमेरिकतील न्यूयॉर्क या शहराचा. फोर्ब्सच्या यादीनुसार, न्यूयॉर्कमध्ये 106 अब्जाधीश राहतात.
  • 2) या यादीत बीजिंग यंदा दुसऱ्या स्थानी आले आहे. चीनची राजधानी असणाऱ्या बीजिंगमध्ये एकूण 83 अब्जाधीश राहतात, असे फोर्ब्सच्या यादीत नमूद केले आहे.
  • 3) तिसऱ्या स्थानावर चीनच्याच एका शहराचा समावेश आहे. त्या शहराचे नाव आहे हाँगकाँग. हाँगकाँगमध्ये 67 अब्जाधीश राहतात.
  • 4) युनायटेड किंगडम मधील लंडन शहर या यादीत चौथ्या स्थानी आहे. तिथे 65 अब्जाधीश आहेत.
  • 5) पाचव्या स्थानी चीनमधील शांघाय शहराचा समावेश आहे. शांघायमध्ये सध्या 61 अब्जाधीश आहेत, असे फोर्ब्सच्या यादीत म्हटले आहे.
  • 6) सहाव्या स्थानी चीनच्या शेंजेन शहराचे नाव नमूद करण्यात आले आहे. तेथे 59 अब्जाधीश राहतात.
  • 7) रशियाची राजधानी व तेथील सर्वात मोठे शहर असणाऱ्या मॉस्को शहराचा या यादीत 7 वा क्रमांक आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, मॉस्कोमध्ये 52 अब्जाधीश राहतात.
  • 8) आठव्या स्थानी आहे भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर. अनेकांचे स्वप्न पूर्ण करणारे शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईत 51 अब्जाधीश राहतात. भारतातील या एकमेव शहराचा फोर्ब्सच्या यादीत समावेश आहे.
  • 9) सॅन फ्रान्सिस्को, हे अमेरिकेतील शहर या यादीत नवव्या स्थानी आहे. तेथे 45 अब्जाधीश राहतात, असे फोर्ब्सच्या यादीत नमूद करण्यात आले आहे.
  • 10) दक्षिण कोरिआची राजधानी असलेल्या सोल या शहराचा या यादीत 10 वा क्रमांक आहे. येथे एकूण 38 अब्जाधीश राहतात.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.