मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार? वाचा A टू Z माहिती

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल. तसेच या तरुणांच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून 6 हजार ते 10 रुपये देखील जमा होणार आहेत.

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार? वाचा A टू Z माहिती
लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार?
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 8:54 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. पण या योजनेवरुन विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात होती. फक्त लाडकी बहीण योजनाच का? महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना का आणली नाही? सरकार असा भेदभाव का करत आहे? असे अनेक सवाल विरोधकांकडून केले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रश्नांना अखेर उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. पण या योजनेसाठी सरसकट सगळेच तरुण पात्र राहणार नाहीत. सरकारने पात्र तरुणांसाठी काही अटी ठेवल्या आहेत.

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल. यासाठी तरुणांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे. पण त्यासाठी तीन वर्गीकरण करण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्य सरकार 12 उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेत असतील तर त्यांना महिन्याला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. आय.टी.आय किंवा डिप्लोमा केलेल्या बेरोजदार तरुणांना दर महिन्याला 8 हजार रुपये मदत देणार आहे. तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना महिन्याला 10 हजार रुपयांची मदत देणार आहे. याशिवाय सहा महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा कारखान्यातून प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नोकरी मिळवताना होणार आहे.

यो योजनेसाठी नेमके पात्र तरुण कोण आहेत?

  • या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
  • दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आत असावं.
  • तरुणाचं शिक्षण हे 12 वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं.
  • संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल
  • तरुणाचं बँक खातं आधारकार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधारकार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते पासबुक

लाडका भाऊ योजनेसाठी कुठे अर्ज करणार?

  • तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
  • तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल.
  • तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल.
  • या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल.
  • यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल.
  • अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.