महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती नॅशनल फॅमिल हेल्थच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. ही बाब महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात -54 अंकांची घट झालीय, तर इतर तब्बल 17 जिल्ह्यातही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे. राज्यातली आकडेवारी आणखी धक्कादायक आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत 11 अंकांची घट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 1 हजार मुलांच्या तुलनेत 924 मुली होत्या ती आकडेवारी आणखी घटून 1000 मुलांमागे केवळ 913 मुली आहेत.
मुली नेमक्या नकोत कुणाला?
हा सर्वे राज्यातील लोकांची मानसिकता दर्शवणारा आहे. पुणे, हिंगोली, औरंगाबाद, भंडारा, मुंबई, बीड, जालना जळगाव जिल्यात मुलींची संख्या 1000 मुलींच्या तुलनेत 900 च्या खाली आली आहे. औरंगाबादेत तर ही आकडेवारी आणखी घटून 875 वर आली आहे. गेल्या सर्वेक्षाच्या तुलनेत ही सर्वात मोठी घट आहे. भंडाऱ्यात गेल्या सर्वेक्षणावेळी 1000 मुलांमागे 1204 मुली होत्या ती संख्या आता मोठ्या प्रमाणत घटली आहे. आता ती आकडेवारी 1000 मुले, 897 मुली अशी झाली आहे. तर बीड हिंगोली भडाऱ्यातही हा फरक वाढत गेलाय.
यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला
अमरावती, गडचिरोरीली, धुळे उस्मानाबाद या जिल्ह्यांनी बेटी बचावचा नारा सार्थ ठरवला आहे. अमरावतीत 1090 मुली 1000 मुली अशी आकडेवारी आहे. गोंदिया, कोल्हापूर, लातूरमध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असणारे जिल्हे जास्त असल्यानं अजून मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट जाणवतंय. अनेकांना अजून वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. त्यामुळे ही मोठी तफावत दिसून येतेय.