MLC Election 2022: महाराष्ट्राचा राजकीय चाणक्य कोण, अजित पवार की देवेंद्र फडणवीस?, काय गणितं, काय वाटाघाटी?

या विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र हा संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा दिसतो आहे. अजित पवारांनी एकेअर्थी फडणवीसांचं आव्हान स्वीकारत, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तो निवडणूक जिंकेल, असे सांगत थेट फडणवीसांनाच आव्हान दिल्याचे मानण्यात येते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा या तिन्ही पक्षांना या निवडणुकीत अधिक मतांची गरज आहे.

MLC Election 2022: महाराष्ट्राचा राजकीय चाणक्य कोण, अजित पवार की देवेंद्र फडणवीस?, काय गणितं, काय वाटाघाटी?
अजित पवारांचं चर्चेतलं उत्तर, यात भाजपचा रोल दिसतो का? दादा म्हणतात, अजून तरी नाही Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 7:27 PM

मुंबई – विधान परिषद निवडणुका (MLC election)अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या आहेत. राज्य़सभा निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूकही महाविकास आघाडी सरकार (MVA)आणि भाजपाने (BJP)प्रतिष्ठेची केली आहे. मात्र या दोन्ही निवडणुकीतील मुख्य फरक आहे तो म्हणजे राज्यसभा निवडणुकीत संघर्ष हा शिवसेना विरुद्ध भाजपा असा होता. त्यात भाजपाने राज्यसभेची तिसरी जागा मिळवत विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे चाणक्य म्हणून उदयाला आले. राज्यातील राजकारणाचे चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवारांनीही हा चमत्कार मान्य केला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही केलं होतं. या विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र हा संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा दिसतो आहे. अजित पवारांनी एकेअर्थी फडणवीसांचं आव्हान स्वीकारत, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तो निवडणूक जिंकेल, असे सांगत थेट फडणवीसांनाच आव्हान दिल्याचे मानण्यात येते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा या तिन्ही पक्षांना या निवडणुकीत अधिक मतांची गरज आहे.

विधान परिषदेचं गणित काय ?

एकूण १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. प्रत्येक उमेदवाराला जिंकून येण्यासाठी २६ मतांचा कोटा आवश्यक आहे. आधी तो २७ होता, पण आता तो २६ वर आलेला आहे. एकूण २८४ आमदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. शिवसेनेकडे ५५ मते आहेत, त्यांचे दोन उमेदवार सचिन अहिर आणि आमषा पाडवी या दोघांसाठी ५२ मते आवश्यक आहेत, ती मते त्यांना सहज शक्य असल्यामुळे शिवेसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानण्यात येतो आहे. या संख्याबळासह शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत. इतर मते धरल्यास शिवसेनेचे संख्याबळ ६२ आहे. आता या अतिरिक्त मतांवर काँग्रेसचा डोळा आहे. बच्चू कडू, शंकरराव गडाख हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदावर असल्याने त्यांच्या मतांचा निर्णय शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा असलेल्या सहा अपक्ष आमदारांना फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आघाडीतील शिवसेनाच टार्गेट होताना दिसते आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी आमदारांची मते या निवडणुकीत किती स्थिर राहतील याबाबत शंका उपस्थित करण्यात येते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सुरक्षित पण..

राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ आहे ५३, मात्र आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेत मतदान करता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ आता ५१ झाले आहे. राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन उमेदवार जिंकून आणण्यााठी राष्ट्रवादीला ५२ मतांची गरज आहे. संजय मामा शिंदे, राजेंद्र येड्रावकर, देवेंद्र भुयार यांच्यासह चार जण अजित पवारांच्या संपर्कात असल्याने, राष्ट्रवादीचे संख्याबळ ५५ होते. म्हणजे दोन उमेदवार निवडून येण्यात अडचण दिसत नाहीये. मात्र एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खडसे बविआ आणि इतर अपक्षांच्या संपर्कात आहेत. एमआयएमच्या एका आमदाराने एक मत खडसेंना देणार असल्याचे सांगितले आहे. काही भाजपाची मतेही आपल्याला मिळतील असा खडसेंचा दावा आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला ८ मतांची गरज

काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप असे दोन उमेदवार दिले आहेत, काँग्रेसची मते आहेत ४४. दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसला ८ मतांची गरज आहे. एमआयएमचे एक मत आता हंडोरेंना नक्की झाले आहे, त्यामुळे अजून काँग्रेसला ७ मते हवी आहेत. या नऊ मतांसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे शिवसेनेच्या आणि भाजपा समर्थित आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. सपाचे दोन आमदार, बविआची दोन किंवा तीन मते आणि अपक्षांची काही मते यावर काँग्रेसच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. दुसरीकडे भाजपाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपात अंतर्गत कलह असून ती मते काँग्रेसला मिळतील, असा नानांचा दावा आहे.

भाजपाला १७ मतांची गरज

भाजपाने उमा खापरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे या पाच जणांना रिंगणात उरवले आहे. भाजपाचे संख्याबळ आहे. १०६ आणि ७ अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, म्हणजेच त्यांचे संख्याबळ आहे ११३. प्रत्यक्षात विजयासाठी भाजपाला गरज आहे १३० मतांची. म्हणजे संख्याबळानुसार भाजपाला १७ जादा मतांची गरज आहे. ती मिळाली नाहीत तर प्रसाद लाड हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मिळून १२३ मते पडली होती. हा आकडा स्थिर राहील असा विचार केला तरी, ७ मते भाजपाला जास्त हवी आहेत. शिवसेनेत, सरकारला पाठिंबा दिलेल्या छोट्या पक्षांत आणि अपक्षांत सरकारविरोधात नाराजी आहे, त्याचा फायदा भाजपाला होईल, असे भाजपाचे नेते सांगत आहेत. राज्यसभेपेक्षा यावेळी वेगळे गणित असेल, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलेले आहे.

कोण अडचणीत, कुणावर मदार

तसं पाहिलं तर या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे किंवा भाई जगताप या दोघांपैकी एक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत एकनाथ खडसे अडचणीत मानले जातायेत. तर भाजपात प्रसाद लाड हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडी, सपा या दोन्ही पक्षांचे मिळून पाच आमदार आहेत. त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. एमआयएमच्या दोन मतांपैकी एक मत हंडोरेंना आणि एक मत खडसेंकडे जाण्याची शक्यता आहे.

अजित पवार विरुद्ध फडणवीस संघर्ष

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी तिन्ही पक्षांचे मिळून १५० आमदार आणि १५ अपक्ष असं १६५ संख्याबळ महावकास आघाडीकडे होतं. त्यात सपा, एमआयएमच्या पाठिंब्याने हा आकडा १६९ पर्यंत संख्याबळ गेले होते. मात्र तरीही प्रत्यक्षात १६२ मतेच आघाडीला पडली होती. तर भाजपाकडे १०६ आणि ७ अपक्ष असे ११३ संख्याबळ असतानाही भाजपाला १२३ मते पडली होती. अशा स्थितीत ही विधानपरिषद निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. दुसऱ्या पसंतीची मते कुणाला पडणार यावरही निकाल बदलण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत सर्व मविआचे उमेदवार निवडून आणण्याचा चंगच अजितदादांनी बांधलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना मात देण्यासाठी निरनिराळ्या बैठका, भेटीगाठीत ते सक्रिय आहेत. अजित पवार रिंगणात उतरल्याने भाजपासाठीही त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे नवे आव्हान असणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे उद्याचा संघर्ष हा थेट अजित पवार विरुद्ध फडणवीस असाच होणार आहे. राज्यसभेत विजय मिळवून देऊन देवेंद्र फडणवीसांचे पक्षातील वजन चांगलेच वाढले आहे. आता या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटणार की अपक्षांतून संख्याबळाचं गणित फडणवीस साधणार हे पहावं लागणार आहे. की अजित पवार मतांचं गणित जमवणार, याकडं महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. या दोघांच्या लढतीत महाराष्ट्राचा नवा राजकीय चाणक्य समजणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.