AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे हा दर्यादिल शेतकरी ? ज्याच्या मुलीच्या लग्नाला जनावर, पक्षी, मुंग्यानीही लावली हजेरी

काबाडकष्ट करून एकेक पै जमा करून त्यानं मोठ्या थाटामाटानं आपल्या मुलीचे लग्न लावले. त्या मुलीच्या लग्नासाठी पंचक्रोशी जमली होती. इतकंच काय तर पशु, पक्षी, जनावर आणि मुंग्यांनीही उपस्थिती लावली होती. पशु, पक्षी यांच्याबद्दल अशी दर्यादिली दाखविणारा हा शेतकरी तुफान चर्चत आलाय.

कोण आहे हा दर्यादिल शेतकरी ? ज्याच्या मुलीच्या लग्नाला जनावर, पक्षी, मुंग्यानीही लावली हजेरी
marriageImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 7:03 PM

बुलढाणा : लग्नसराई म्हटले की नातेवाईकांची, गाववाल्यांचे रुसवे फुगवे आलेच. शुल्लक कारणावरून भर लग्नात रुसून बसणाऱ्यांचीही संख्या इथे काही कमी नाही. पण, बुलडाण्यातील एका शेतकऱ्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची देशभरात एकच चर्चा होत आहे. कारण, काबाडकष्ट करून एकेक पै जमा करून त्यानं मोठ्या थाटामाटानं आपल्या मुलीचे लग्न लावले. त्या मुलीच्या लग्नासाठी पंचक्रोशी जमली होती. इतकंच काय तर पशु, पक्षी, जनावर आणि मुंग्यांनीही उपस्थिती लावली होती. पशु, पक्षी यांच्याबद्दल अशी दर्यादिली दाखविणारा हा शेतकरी तुफान चर्चत आलाय. शेतावर काम करून, घाम गाळून धान्य पिकविणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या मुलीचा लग्नाला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दहा हजार लोकांनी जेवणाच्या पंगतीचा लाभ घेतला.

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी गाव आहे. या गावचा शेतकरी प्रकाश सरोदे यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न ठरले. भारतीय लष्कर दलात असणारा जवान अतुल दिवाणे हा त्यांचा जावई. घरात लग्नसराई सुरु झाली. जसजसा लग्नाचा दिवस जवळ येत होता तस तशी त्यांची लगबग वाढत होती.

हे सुद्धा वाचा

लग्नाची तयारी काही आठवड्यांपूर्वीच सुरू केली होती. जयमालासाठी भव्य स्टेजही तयार केला होता. 5 एकराचा मंडप तर लोकांच्या जेवणासाठी मोठा पंडाल सजवण्यात आला. लग्न सोहळ्याचे आजूबाजूच्या पाच गावांना निमंत्रण देण्यात आले. शिवाय लग्नाच्या वरातीपर्यंत थांबण्याची विनंतीही वधू पित्याकडून करण्यात आली.

लग्नाचा हा थाट पाहून हे लग्न सामान्य शेतकऱ्याच्या मुलीचे नसून उद्योगपतीचे आहे असे कुणालाही वाटावे. अख्खा गाव नववधूप्रमाणेच नटून थटून लग्नासाठी आला होता. लग्नाची मेजवानी सुरु झाली. एकावर एक पंगती उठू लागल्या. सुमारे 10,000 लोकांनी या भोजन करून तृप्त मनाने ढेकर दिल्या.

विशेष म्हणजे ही मेजवानी फक्त माणसासाठीच नव्हती. त्या शेतकऱ्याने गायी, मुंग्या, पक्षी यांनाही मेजवानी म्हणून खाऊ ठेवला होता. गुरांसाठी 10 ट्रॉली सुक्या चाऱ्याची व्यवस्था केली होती. तर, गायींसाठी 10 क्विंटल चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी स्वतंत्र शेड बांधली होती.

मुंग्यांसाठी साखरेच्या दोन पोती आणि पक्ष्यांसाठी तांदळाच्या अनेक पोती तर, कुत्र्यांसाठीही स्वतंत्र भोजन व्यवस्था केली होती. एका शब्दात सांगायचे तर कोणीही उपाशी झोपणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेली होती.

30 ते 35 लाख रुपये खर्च

प्रकाश सरोदे यांच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात व्हावे अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या मुलीच्या लग्नासाठी ते पैसे वाचवत होते. या लग्नासाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपये खर्च झाले असे ते सांगतात.

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.