मुख्यमंत्रीपदासाठी कोणी केला त्याग, अमित शहांना नेमकं काय सांगायचंय?

गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्याग केल्या संदर्भात वक्तव्य केल्याची माहिती आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या माणसांनी त्याग केल्याचं अमित शाह यांनी म्हटल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. मात्र अचानक शाहांना नेमकं एकनाथ शिंदेंना काय सांगायचंय, पाहुयात

मुख्यमंत्रीपदासाठी कोणी केला त्याग, अमित शहांना नेमकं काय सांगायचंय?
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 9:58 PM

एकनाथ शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रिपद आणि भाजपला अधिक वाटा मिळावा या, बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांनी आहुतीची आठवण करुन दिली. आता बावनकुळे आणि संजय शिरसाट असं का म्हणालेत, तर त्याचं कारण आहे जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान अमित शाहांचं शिंदेंना उद्देशून वक्तव्य. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. शिंदेंजी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं कामं पूर्ण होण्यासाठी केलेली फक्त व्यवस्था आहे. तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं त्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. असं अमित शाह म्हणालेत.

आता या वक्तव्यावरुन, देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केलाय हेच अमित शाहांना सूचवायचं होतं, असं दिसून येते. सव्वा 2 वर्षांआधी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती सरकारमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री होईल असं वाटत होतं. मात्र त्यावेळी पत्रकार परिषदेत स्वत: फडणवीसांनी शिंदेंच्या नावाची घोषणा केली होती आणि भाजपच्याही नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

याच त्यागाची आठवण अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना करुन दिल्याची चर्चा आहे. मात्र स्वत: मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी ही बातमीच फेटाळली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बातमी फेटाळली असली तरी त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्रिपद शिंदेंना दिल्यामुळं भाजपला जास्त वाटा मिळावा हीच भावना असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी मात्र पुन्हा टीकास्त्र सोडत अमित शाह किंवा भाजपचा त्याग नाही तर शिवसेना तोडण्यात यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. 105 आमदार असताना भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं, हे वास्तव आहे. पण शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचं धाडस केलं नसतं तर पुढची पावलंच पडली नसती हेही सत्य आहे. पण जागा वाटपाच्या बैठकीतून शाहांनी उद्देशून बोलल्याची जी बातमी बाहेर आली, ती चर्चाच शिंदे आणि फडणवीसांनी फेटाळली.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....