नांदेड मधल्या वेश्या व्यवसाय करणा-या महिलांचं अनुदान लाटलं कुणी ? जिल्हाधिकारी करणार चौकशी
वेश्या व्यवसाय करण्यापासून महिलांनी परावृत्त व्हावं या हेतून राज्य सरकारच्या जिल्हा महिला बालविकास कार्यालकडून निराधार महिलांची एक यादी तयार केली जाते.
नांदेड – राज्य शासनाकडून अनेक निराधार महिलांना त्यांच्या उदरनिर्वाह करण्यापुरतं अनुदान देण्यात येतं. त्यामध्ये निराधार महिलांमध्ये महिलांचा समावेश असून त्यापैकी वेश्या व्यवसाय करणा-या महिलांना सरकारकडून अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर हे अनुदान महिन्यापोटी देण्याची तरतूद असल्याची माहिती मिळत आहे. पण नांदेडमध्ये (nanded) हे अनुदान लाटल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे नेमकं अनुदान गेलं कुठं ? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणाबाबत अनेक ठिकणी वाच्यता झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (vipin itankar) यांनी दिली आहे. दोन कोटी 80 लाख रूपयातले फक्त दोन कोटी 4 लाख वाटले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने किती मोठा घोटाळा (Scam) झाला असेल अंदाज तुम्हाला आला असेल. अधिका-यांनी की मंत्र्यांनी पैसे लाटले हे सुध्दा काही दिवसात उघडकीस येईल.
वेश्या व्यवसाय करण्यापासून महिलांनी परावृत्त व्हावं या हेतून राज्य सरकारच्या जिल्हा महिला बालविकास कार्यालकडून निराधार महिलांची एक यादी तयार केली जाते. त्या यादीची खात्री झाल्यानंतर आणि त्या महिलांचे कागदपत्रं तपासणी केल्यानंतर या महिलांना अनुदान देण्यात येतं. हे अनुदान निराधार महिलांच्या डायरेक्ट खात्यात जाते. पण मागच्या काही महिन्यांपासून या महिलांच्या अकाऊंटमध्ये हे अनुदान पोहचले नसल्याने त्यांनी चौकशी केली. परंतु सुरूवातीला काहीचं माहित नसलेल्या महिलांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. परंतु या महिलांनी याची वाच्यचा करण्यास सुरूवात केल्यानंतर ही बातमी संपुर्ण जिल्ह्यात पसरली असून त्याची चौकशी करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. त्यामुळे नेमकी चौकशी कोणाची करणार तसेच दोषींवर काय कारवाई होणार याकडे नांदेड करांचे लक्ष लागले आहे.
महिलांना आत्तापर्यंत जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत दोन कोटी 81 लाख 65 हजार एवढे अनुदान मंजुर झाल्याची माहिती महिलांना मिळाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत दोन कोटी 4 लाख अनुदान वाटप केल्याची माहिती आहे. महिलांनी विचारणा केल्यानंतर ही खासगी बाब असून त्याची माहिती आम्हाला देता येत नाही असं कार्याकडून सांगण्यात आलं. त्यानंतर चिडलेल्या महिलांनी याबाबत चौकशी करण्याचं ठरवलं. तसेच अनुदान गायब झाल्याची खबर संपुर्ण जिल्ह्यात व्हायरल झाली. त्यानंतर चौकशी करु असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहे.