भाजप हायकमांड आणि एकनाथ शिंदे यांची सतत फोनवर चर्चा, मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स वाढला, सूत्रांकडून मोठी बातमी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर 48 तासांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत अस्पष्टता आहे. महायुतीला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्र्याचा चेहरा अद्याप निश्चित नाही. भाजपचे हायकमांड हा निर्णय घेणार असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा आहे. राज्यात राजकीय हालचाली सुरू असून, शिंदे यांना दिल्लीला बोलावण्याची शक्यता आहे.

भाजप हायकमांड आणि एकनाथ शिंदे यांची सतत फोनवर चर्चा, मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स वाढला, सूत्रांकडून मोठी बातमी
एकनाथ शिंदे आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 9:53 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 48 तासांचा कालावधी झाला असला तरीही मुख्यमंत्री कोण? हे अद्याप ठरलेलं नाही. महायुतीचं सरकार येणं हे आता स्पष्ट झालं आहे. कारण महायुतीला 230 जागांवर यश मिळालं आहे. पण असं असलं तरी महायुतीने अजूनही सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. कारण महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराच अद्याप ठरलेला नाही. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याचा निर्णय भाजपचं दिल्लीतील हायकमांड ठरवणार आहे. याआधी अडीच वर्षांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा भाजपच्या हायकमांडने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता भाजप हायकमांड कुणाला संधी देतं? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर पडद्यामागे प्रचंड घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात सतत फोनवरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदेंना तातडीनं दिल्लीला बोलवलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या 48 तासानंतरही मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित नाही. महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन दिल्लीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पण या घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

रखडलेले प्रकल्प, लाडकी बहीण योजना, धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आणि मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

एकनाथ शिंदे उद्या राजीनामा देणार?

दरम्यान, जुनी विधानसभा उद्या बरखास्त होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत. उद्या जुनी विधानसभा बरखास्त होत असून तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.