BJP: बावनकुळेंना 2019 मध्ये विधानसभेचं तिकिट का नाकारलं ? राजकारण संपल्याच्या चर्चा करणाऱ्यांना फडणवीसांनी दिलं उत्तर.. म्हणाले..

फडणवीस म्हणाले, ज्या दिवशी निर्णय झाला त्यानंतर एकही दिवस बावनकुळे थांबले नाहीत. त्यांनी तत्काळ निर्णय स्वीकारला आणि ताकदीने काम सुरु केलं. त्या निवडणुकीत 32मतदारसंघात पूर्णपणे दौरे करुन मतदारसंघ निवडून येतील यासाठी प्रयत्न केला. भाजपात सातत्य, पक्षशिस्त पाळणाऱ्यांना मागे पाहावे लागत नाही.

BJP: बावनकुळेंना 2019 मध्ये विधानसभेचं तिकिट का नाकारलं ? राजकारण संपल्याच्या चर्चा करणाऱ्यांना फडणवीसांनी दिलं उत्तर.. म्हणाले..
टीकाकारांना फडणवीसांचे उत्तर Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 7:10 PM

नागपूर – 2019 विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. आता चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. यानिमित्तान त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सहळ्या टीकाकारांना योग्य उत्तर दिले आहे. पक्षाची शिस्त आणि सातत्य जी मंडळी पाळतात, त्यांना कधीही मागे बघावे लागत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. त्यावेळी चर्चा करणाऱ्यांना भीती होती की बावनकुळे यांची रजकीय कारकीर्द संपले, पण तेव्हा आपण बावनकुळे हे आहेत, त्यापेक्षा मोठे झालेले असतील असे विधान केले होते, ्से फडणवीस यांनी सांगितले आणि आज ते प्रत्यक्षात समोर दिसते आहे, असे सांगत त्यांनी सगळ्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ज्यावेळी बावनकुळे यांनी विधानसभा न लढता, 32 मतदारसंघांची जबाबदारी द्यावी, असा निर्णय पक्षाने घेतला. त्यावेळी अनेकांना असं वाटतं होतं की आता बावनकुळे यांचं राजकारण संपलं. अनेक जणं असे बोलायचे देखील. मी त्यावेळेसचं सांगितलं होतं, कारण भाजपातची निती आणि रिती मला माहिती आहे. बावनकुळेंसारख्या कार्यकर्त्याचं महत्त्व भाजपासारख्या पक्षाला माहिती आहे. म्हणून त्याचवेळी मी सांगितलं होतं की, तुम्ही विचा करताय त्यापेक्षा मोठे बावनकुळे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. कधीतरी विधिमंडळातील आमदारांनी पक्षासाठी काम करावं. संघटनेच्या लोकांनी कधी विधिमंडळात काम केलं पाहिजे. हे भाजपात नेहमीचं होतं. अनेकवेळा मोठमोठ्या नेत्यांना आपण सांगतो की आता पक्षाची आवश्यकता आहे. तुम्ही आता मंत्रिपद घेऊ नका पक्षाचं काम करा. कारण सगळ्यांनीच जर विधिमंडळात काम केलं तर पक्ष हा विधिमंडळाच्या कामानं वाढत नाही. त्यानं मतदार वाढतील. पण संघटनाही काम करुन वाढत असते.

पक्षशिस्त पाळणाऱ्यांना मागे पाहावे लागत नाही

याा अभिमान आहे की, ज्या दिवशी निर्णय झाला त्यानंतर एकही दिवस बावनकुळे थांबले नाहीत. त्यांनी तत्काळ निर्णय स्वीकारला आणि ताकदीने काम सुरु केलं. त्या निवडणुकीत 32मतदारसंघात पूर्णपणे दौरे करुन मतदारसंघ निवडून येतील यासाठी प्रयत्न केला. भाजपात सातत्य, पक्षशिस्त पाळणाऱ्यांना मागे पाहावे लागत नाही. आज त्याचं उदाहरण बावनकुळे आहेत. ते पक्षाच्या सर्वोच्च स्थानावर ते बसले आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्षाचा विस्तार होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

दोन अडीच वर्ष गडकरींमुळे महाराष्ट्राची इज्जत वाचली

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात नितीन गडकरींमुळे महाराष्ट्राची इज्जत वाचली, असेही फडमवीस म्हणाले आहेत. त्या काळात नितीन गडकरी यांनी मोठे इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरु केले म्हणून राज्याची इभ्रत वाचली, असे फडणवीस म्हणाले. नाहीतर खड्ड्यांचा महाराष्ट्र अशी अवस्था होती. ती दूर करुन आता रस्ते, पुलं, पिण्याच्या पाण्याच्या योजना, इन्फ्रा प्रोजेक्टच्या बळावर मजबूत महाराष्ट्र उभा करु. असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.