कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राताली गावांचा लळा, का आणि कशासाठी…

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांचा आताच का लळा लागला आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राताली गावांचा लळा, का आणि कशासाठी...
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 9:17 PM

सांगलीः पाणी आणि रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यातील चाळीस गावांनी तत्कालीन सरकारला कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील सरकार बदलले आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील योजनांनादेखील गती मिळाली. त्यामुळे विकासात्मक गोष्टी या तालुक्यालाही मिळाल्या. ज्या योजनांसाठी या गावांनी इशारा देण्यात आला होता ती म्हैसाळ योजनादेखील आता अंतिम टप्प्यात आली. त्यामुळे या 40 गावांपैकी एकही गाव आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या मानसिकतेत नाही.

त्यामुळे 2009 म्हणजेच 13 वर्षानंतर बसवराज बोमई यांना यांना सांगली जिल्ह्यातील या 40 गावांची आठवण का झाली आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

बेळगावचा सीमालढा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे, त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर त्यांनी दावा केला आहे.

त्यामुळे सीमाभागातील नागरिकांसह महाराष्ट्राताली नेत्यांनाही अजब वाटले आहे. त्यामुळे 13 वर्षापूर्वी जत तालुक्यातील ज्या गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता.

त्या 40 गावांचा लळा आता कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांना आला आहे. जत तालुक्याती 40 गावांना पाणी आणि रस्त्याची सुविधा नसल्याने त्यांनी कर्नाटक सरकारला पत्र लिहून 2012 आणि 2015 साली कर्नाटकात येणार असल्याचे कळवले होते.

त्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जत तालुक्याचा दौरा करुन पाणी समस्या सोडवण्याचे अश्वासन दिले होते. त्यानंतर सरकारकडून जत तालुक्यात विकास करण्याचा प्रयत्नही झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने 11 ऑगस्ट 2021 म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले जाते.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.