Amit Shaha: सहकार चळवळ मागे का पडली? हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? अमित शहांची जोरदार टोलेबाजी

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात प्रथमच सहकार परिषद होत आहे. यानिमित्त त्यांनी सहकार क्षेत्राविषयी सविस्तर मांडणी केली.

Amit Shaha: सहकार चळवळ मागे का पडली? हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? अमित शहांची जोरदार टोलेबाजी
सहकार मंत्री अमित शहा यांचे अहमदनगर परिषदेत भाषण
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 2:19 PM

अहमदनगरः केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले, याविषयी जोरदार फटकेबाजी केली.

सहकार चळवळ मागे का पडली…

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, ‘ सहकार चळवळ मागे का पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास तुमच्या मदतीसाठी तयार आहे, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं.

कुठे गेल्या महाराष्ट्रातील सहकारी बँका?

अमित शहा पुढे म्हणाले, ‘ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होतं. आज काय झालं कुठे गेल्या या बँका. घोटाळे का झाले. स्थिती काय आहे. केवळ तीनच उरल्या आहे. हजारो कोटीचे घोटाळे कसे झाले. हे काय रिझर्व्ह बँकेने केले का … नाही नाही… रिझर्व्ह बँकेने केले नाही. मी राजकीय भाष्य करायला आलो नाही. पण सहकारीता आंदोलनातील कार्यकर्त्यांना जरूर सांगेल सरकार तुमच्या सोबत आहे. मोदी तुमच्यासोबत आहे. सहकारीता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यावसायिकता आणली पाहिजे. मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना या आंदोलनात सहभागी करयाला पाहिजे. नव्या नेतृत्वाकडे त्याची धुरा दिली तर पुढील ५० वर्ष ही चळवळ टिकून राहील.

प्रवरानगर ही सहकार क्षेत्राची काशी!

केंद्रीय सहकारी मंत्री यांनी प्रवरानगर येथील भूमीचे वर्णन करताना , ही भूमी सहकारीता क्षेत्रात काशी एवढीच पवित्र आहे, असे म्हटले. ते म्हणाले, ‘ त्याकाळात बाळासाहेब विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची चळवळ रोवली. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या भूमीत येऊन नतमस्तक व्हायला हवं. गुजरातमध्येही सहकार चळवळ सुरू झाली. अमूल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अमूलचा टर्न ओव्हर  50 हजार कोटींचा आहे. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यात चळवळ उभी केली. मोदींनी सहकारीतासाठी सहकार मंत्रालय तयार केलं. 75  वर्ष कुणालाही असं मंत्रालय करावं असं वाटलं नाही. सहकारीता आजही प्रासंगिक आहे. सबका साथ आणि सबका विकासचा मंत्र केवळ सहकारीतेतूनच होऊ शकतो हे माहीत आहे म्हणूनच मोदींनी हे मंत्रालय तयार केलं, असंही अमित शहा म्हणाले.

इतर बातम्या-

Ramdas Kadam: भगव्याची साथ सोडणार का? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत? काय म्हणाले रामदास कदम?

Radhakrishna Vikhe | राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले, पण त्यांनी सहकाराबद्दल काहीच नाही केले; विखे-पाटलांचे शरसंधान

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.