अब राजा का बेटाही राजा नही बनेगा, पाच वर्षात स्टेज सांभाळणारा मंत्री झाला, मंत्री असलेले घरी गेले, तो Videoव्हायरल

ह्या व्हीडीओत जे थाटामाटात बसलेले नेते मंडळी आहेत, त्यात पंकजा मुंडे विधानसभेला पराभूत झाल्या. राम शिंदेही पडले. बबनराव लोणीकर तेवढे निवडूण आले. महादेव जानकरही आता फार सक्रिय दिसत नाहीत

अब राजा का बेटाही राजा नही बनेगा, पाच वर्षात स्टेज सांभाळणारा मंत्री झाला, मंत्री असलेले घरी गेले, तो Videoव्हायरल
bhagwat karad
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 12:18 PM

मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात महाराष्ट्रातून चार जणांना मंत्री करण्यात आलंय. त्यात सर्वात जास्त चर्चा होतीय ते भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्रिपदाची. त्याला कारण आहेत मुंडे भगिनी. कारण कराडांना दिलेल्या मंत्रिपदामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेच्या एका सभेचा व्हीडीओ व्हायरल होतोय. या व्हीडीओत महादेव जानकर आहेत, पंकजा मुंडे आहेत, राम शिंदेही आहेत. आणि विशेष म्हणजे भागवत कराडही आहेत. आता व्हीडीओ व्हायरल होतोय तो भागवत कराडांमुळे. काय आहे त्या व्हीडीओत?

काय आहे त्या व्हायरल व्हीडीओत? 1 मिनिट 24 सेकंदाचा हा व्हीडीओ आहे. हा व्हीडीओ 2016 सालचा आहे. ह्या व्हीडीओत राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर भाषण करतायत. तर सोफ्यावर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर, आणि नामदेव शास्त्रीही आहेत. भगवानगडावर जो दसरा मेळावा होतो, त्यावेळेसची ही सभा आहे. याच सभेत महादेव जानकारांनी चांगलीच फटकेबाजी केली होती. पंकजा मुंडे, राम शिंदे त्यावेळेस मंत्री होते. जानकरांच्या फटकेबाजीला टाळ्या पडत होत्या कारण ते मंत्री असूनही फडणवीस सरकारला कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टोले मारत होते. मुंडे भगिनी त्यावेळेसही फडणवीसांवर नाराज असल्याची चर्चा होतीच. आता का चर्चेत आहे तो व्हीडीओ? जवळपास पाच वर्षानंतर हा व्हीडीओ पुन्हा चर्चेत आहे. त्याला कारण आहेत ते केंद्रात नव्यानं मंत्री झालेले भागवत कराड. ह्या व्हिडीओत भागवत कराड जानकरांच्या मागे उभे आहेत. त्यावेळेस त्यांनी ह्या सभेचं सूत्रसंचलन केलं होतं. एक प्रकारे सभेचं स्टेज सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. व्हीडीओतही ज्यावेळेस गर्दी हुल्लडबाजी करायला लागली त्यावेळेस भागवत कराडांनीच त्या गर्दीला थोपवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. हा व्हीडीओ व्हायरल होतोय ते बदललेल्या परिस्थितीमुळे.

म्हणजेच मुंडे भगिनींचं स्टेज सांभाळणाऱ्या एका कार्यकर्त्याला भाजपनं थेट केंद्रीय मंत्री केलं. ह्या व्हीडीओत जे थाटामाटात बसलेले नेते मंडळी आहेत, त्यात पंकजा मुंडे विधानसभेला पराभूत झाल्या. राम शिंदेही पडले. बबनराव लोणीकर तेवढे निवडूण आले. महादेव जानकरही आता फार सक्रिय दिसत नाहीत. भागवत कराडांना मंत्रीपद मिळालं म्हणून प्रीतम मुंडेच नाराज आहेत. नामदेव शास्त्री आणि मुंडे भगिनी यांच्यातही फार सख्य राहीलं नाही. पाच वर्षात सोफ्यावर बसलेली, भाषणं ठोकणारी मंडळी जवळपास अडगळीत पडलीयत आणि स्टेज सांभाळणारा आधी खासदार झाला आणि नंतर मंत्रीही. तेही अर्थखात्याचे राज्यमंत्री.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.