Sharad Pawar | गोविंद बागेत अजित पवार येणार की, नाहीत? सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि नेत्यांना भेटत आहेत. त्यांच्याकडून दिवाळी शुभेच्छांचा स्वीकार करतायत. दरवर्षी पाडव्याच्या सकाळी गोविंद बागेत हा कार्यक्रम होतो.

Sharad Pawar | गोविंद बागेत अजित पवार येणार की, नाहीत? सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 8:30 AM

बारामती (प्रदीप कापसे) : आज दिपावली पाडवा आहे. या निमित्ताने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलय. आज बारामतीच्या गोविंद बागेवर मीडिया आणि राजकीय विश्लेषकांच लक्ष असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबीय दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. बारामतीच्या गोविंद बागेत मंडप घालण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि नेत्यांना भेटत आहेत. त्यांच्याकडून दिवाळी शुभेच्छांचा स्वीकार करतायत. दरवर्षी पाडव्याच्या सकाळी गोविंद बागेत हा कार्यक्रम होतो. यावर्षीचा पाडवा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळा आहे. कारण काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला आहे. सध्या निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण आहे.

त्यामुळे आज गोविंद बागेत होणाऱ्या कार्यक्रमाला अजित पवार येणार का?हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. राजकीय मतभेद असले तरी, पवार कुटुंब एकत्र आहे. मागच्याच आठवड्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र आलं होतं. त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यानंतर अजित पवार अमित शाह यांची भेट घेण्यासाठी निघून गेले. या भेटीवरुन बरेच तर्क-विर्तक लढवले गेले. कालच श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र आलं होतं. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधु आहेत. खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे फोटो इन्स्टावर शेअर केले. य फोटोत अजित पवार दिसले नाहीत. पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या.

अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“राज्य सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत, त्यांनी थोडी संवेंदशीलता दाखवली पाहिजे. राज्यात आरक्षणाचे प्रश्न आहेत महागाई, बेरोजगारी असे प्रश्न आहेत. दुष्काळाचे मोठं संकट आहे. त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी करावी” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. अजित पवारांसंदर्भातील प्रश्नावर म्हणाल्या की, “संभ्रम असण्याच काही कारण नाही. आपल्याला माहिती आहे की अजित पवारांना डेंग्यू झालेला आहे. “रोहित पवार संघर्ष यात्रेच्या निमित्ताने फिरतोय. तो तिकडे दिवाळी करतोय याचा अभिमान आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी लोक येतात हे आमच भाग्य आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.