‘कसबा’ची पुनरावृत्ती नागपूरमध्ये होणार का ? देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कुणाचे आव्हान ?

नागपूर हा फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जात आहे. या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघातुन आपणास उमेदवारी मिळाल्यास येथे कसबा करून दाखवेन असे आव्हानच काँग्रेस नेत्याने दिले आहे.

'कसबा'ची पुनरावृत्ती नागपूरमध्ये होणार का ? देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कुणाचे आव्हान ?
CONGRESS AND DEVENDRA FADNAVISImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 1:38 PM

नागपूर : कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविली. त्यामुळेच कसबा विधानसभेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला. त्यावरून आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लक्ष केले जात आहे. नागपूर हा फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जात आहे. या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघातुन आपणास उमेदवारी मिळाल्यास येथे कसबा करून दाखवेन असे आव्हानच या काँग्रेस नेत्याने दिले आहे.

दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असून येथून ते २००९ पासून निवडून येत आहेत. २००४ साली त्यांनी नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघतून काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव केला होता. याच रणजित देशमुख यांचा मुलगा आशिष देशमुख यांनी फडणवीस यांना ललकारले आहे.

हे सुद्धा वाचा

२०१९ मध्ये डॉ. आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण – पश्चिम नागपूर मतदार संघातून लढत दिली होती. त्यावेळी फडणवीस यांना सुमारे १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, फडणवीस यांना फक्त ३५ हजारांचा लीड मिळाला. त्यावेळी दक्षिण-पश्‍चिममध्ये काम करायला केवळ ११ दिवस मिळाले होते याकडे आशिष देशमुख यांनी लक्ष वेधले.

पुणे शहरातील कसबा आणि नागपूर मधील दक्षिण – पश्‍चिम मतदारसंघांमध्ये भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. येथे संघाचे मुख्यालय असले तरी कॉंग्रेसची पाळेमुळे येथे भक्कम आहेत. ज्या पद्धतीने अत्यंत सुरक्षित मतदार संघ कसबा भाजपच्या हातून गेला त्याच पद्धतीने दक्षिण-पश्चिम नागपूर हा मतदारसंघही जाईल असा दावा त्यांनी केला.

नागपूर जिल्हा परिषद, नागपूर पदवीधर मतदारसंघ किंवा नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पाहिली तर मागील काही काळापासून नागपूर कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहात आहे. कसबाही भाजपचा बालेकिल्ला होता. साम, दाम, दंड, भेद सर्व काही करूनही तेथे त्यांना विजय मिळवता आला नाही. येथेही ब्राम्हण समाजाची सुमारे ३० ते ३५ टक्के मतदार असून ते भाजपवर नाराज आहेत. आतून खूप खदखद आहे, असे ते म्हणाले.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे भाजपला यापुढील प्रत्येक निवडणुकीत भोवणार आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेसचे स्थान अढळ आहे आणि भाजप सध्या एकापाठोपाठ चुका करत आहे. त्यामुळे जनता पुन्हा कॉंग्रेसकडे वळणार. २०२४ साठी पक्षाने आदेश दिल्यास विजय नक्की होईल. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत दक्षिण-पश्‍चिमचा कसबा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आशिष देशमुख यांनी दिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.