Omicron Update | जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता, ओमिक्रॉन घातक ठऱणार ? वाचा सविस्तर

बहुतांश ओमिक्रॉनबाधित लोकांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं नाहीयेत. पण, तरीही सारं जग सतर्क आहे; कारण ओमिक्रॉन विषाणू फैलावाचा दर हा इतर कोरोना विषाणूंच्या तुलनेत जास्त आहे.

Omicron Update | जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता, ओमिक्रॉन घातक ठऱणार ? वाचा सविस्तर
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:09 PM

मुंबई : राज्यात ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येणार का ? लाट आलीच तर तिची संहारकता काय असेल ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याचाच हा आढावा. बहुतांश ओमिक्रॉनबाधित लोकांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं नाहीयेत. पण, तरीही सारं जग सतर्क आहे; कारण ओमिक्रॉन विषाणू फैलावाचा दर हा इतर कोरोना विषाणूंच्या तुलनेत जास्त आहे.

दक्षिण अफ्रिकेत 200 पटीनं रुग्णवाढ सुरु झाली

1 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत 200 रुग्ण आढळले होते. नंतर 1 तारखेपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत रोज सरासरी 300 रुग्ण आढळत होते. त्यानंतर 23 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन पसरल्यावर शिक्कामोर्तब झालं. तेव्हापासून दक्षिण अफ्रिकेत 200 पटीनं रुग्णवाढ सुरु झाली. सध्या दक्षिण आफ्रिकेत रोज 15 हजारांच्या आसपास नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट जर घातक असेल, तर त्याचा प्रसाराला एक ते दीड महिना लागतो, याचा अनुभव डेल्टा व्हेरियंटवेळी महाराष्ट्राला आला आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येऊ शकते

कारण, फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात अमरावतीत डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव झाला होता. नंतर मार्च महिन्यापासून महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली होती. याचा अर्थ अमरावतीतला डेल्टा व्हेरियंट महाराष्ट्रभर पसरायला एक महिना लागला होता. आता IIT-हैदराबाद आणि IIT कानपूरच्या अंदाजानुसार ओमिक्रॉनमुळे भारतात येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येऊ शकते. पण ही लाट डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत सौम्य असेल असे सांगितले जात आहे. डेल्टा व्हेरियंटच्या प्रसारावेळी भारतात दिवसाला 4 लाख रुग्ण आढळण्याचा विक्रम झाला. मात्र ओमिक्रॉनची लाट आली, तर दिवसाला साधारण 2 लाख रुग्ण या विषाणूने बाधित होण्याचा अंदाज आहे. पण, ओमिक्रॉनमुळे मृत्यूदर वाढणार का ? यावर अजून स्पष्टता नाही.

14 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या एकाच महिन्यात देशात तब्बल 25 लाख लग्न होणार

डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या लाटेमधला मोठा फरक म्हणजे जेव्हा डेल्टा व्हेरियंटचा फैलाव सुरु झाला, तेव्हा 5 टक्के सुद्धा लसीकरण झालेलं नव्हतं. मात्र सध्या देशात शंभर कोटींहून जास्त लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या धोका हा ओमिक्रॉनची संभाव्य लाट आणि गर्दीचा आहे. कारण, 14 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या एकाच महिन्यात देशात तब्बल 25 लाख लग्न होणार आहेत.एकट्या दिल्लीत दीड लाख लग्नसोहळे होण्याचा अंदाज आहे. शिवाय डिसेंबरमध्ये काही जिल्हा परिषदा आणि मार्चच्या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकाही लागण्याची शक्यता आहे.

गर्दीचा पूर आणि ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येचा स्फोट

त्यामुले देशाला पुन्हा एकदा लॉकडाऊनला जावं लागेल का, याचं उत्तर कुणाकडेच नाही. पुन्हा मृत्यूचं तांडव होईल का, याबाबत जागतिक आरोग्य संघटनासुद्धा ठोस नाही. मात्र गर्दीचा पूर आणि ओमिक्रॉनचा व्हेरियंट रुग्णसंख्येचा स्फोट घडवू शकतात, यावर जगभरातले डॉक्टर ठाम आहेत.

इतर बातम्या :

पुन्हा सैराट ! पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने भावने केली हत्या, बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं, महाराष्ट्र हादरला

पुण्यात 1 पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनबाधित, लस घ्या अन् कोरोना नियम पाळा; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

शिवेसना पदाधिकाऱ्याचा कारनामा, स्वत:वर गोळीबार झाल्याचा रचला कट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.