निवडणुकीत खर्चाची मर्यादा वाढणार का? काय म्हणालं निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणूक आयोगाने याआधी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. ज्यामध्ये काही नेत्यांनी खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने काय उत्तर दिले जाणून घ्या.

निवडणुकीत खर्चाची मर्यादा वाढणार का? काय म्हणालं निवडणूक आयोग
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 4:50 PM

विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली आहे. त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाने सांगितले की, ज्यांची क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल त्यांना वर्तमानपत्रात बातमी द्यावी लागणरा आहे. आमच्याविरोधात हे हे गुन्हे आहेत असं मतदारांना सांगावं लागेल. राजकीय पक्षांनाही कारण द्यावं लागेल. तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार का दिले हे राजकीय पक्षांनी सांगायचं आहे. तुमच्या मतदारसंघात चांगले उमेदवार नव्हते का ही माहितीही दिली पाहिजे. असेल तर सांगा. नसेल तर तेही सांगा.

अधिकाऱ्यांची बदली होणार

राजीव कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक व्यक्तिगत बाब सांगितली. तीन वर्षापासून एका ठिकाणी असलेल्यांची तात्काळ बदली करण्यात येणार आहे. डीजीपीला आम्ही आदेश दिले आहेत. कुणीही अपवाद राहता कामा नये. सर्वांची बदली करा. अधिकाऱ्यांबाबत वैयक्तिक तक्रारी आल्या आहेत. लेखी तक्रारी आल्या आहेत. त्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. पण पत्रकार परिषदेत सांगणार नाही.

विधानसभा निवडणुकीत काही अपवाद सोडून सर्वांची चेकिंग करा. २०२४च्या निवडणुकीत झाली होती. चौकशी करण्याची वेळ आली तर घाबरू नका असं ही त्यांनी सांगितलं.

खर्चाची मर्यादा वाढणार नाही

निवडणुकीत सध्या ४० लाखाची मर्यादा आहे. ती वाढवावी अशी मागणी झाली आहे. कारण खर्चाचे रेट अधिक आहे. ते निर्धारीत करण्याची पक्षांनी विनंती केली आहे. त्याचा विचार केला जाईल. खर्चाची लिमिट देशव्यापी असते. ती एका राज्यासाठी होत नाही. दोन ते तीन वर्षात आम्ही त्याचं रिव्ह्यू करतो. सध्या तरी खर्चाची लिमिट तीच राहील.

महिला मतदारांची संख्या महाराष्ट्राची संख्या वाढवली आहे. तरुण महिला मतदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला. शहरी भागातील मतदान केंद्रावर १००% cctv लावण्याचा प्रयत्न करु. शौचालयची सुविधा असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल. जिकडे लांब रांग असेल तिथे बेंचेस आणि खुर्च्या लावल्या जातील. Cenior सिटीझन आणि pwd वर लक्ष केंद्रित केले आहे. जिकडे जायची गरज लागेल तिकडे आम्ही मतदान घ्यायला जावू. प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जे लागेल ते प्रयत्न करु. काही पोलिंग स्टेशनमध्ये मतदान कमी झाले होते तिकडचे मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. असं ही राजीव कुमार म्हणाले.

या तिघांचं मिठना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.