यंदाच्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांना सहभागी होता येणार का? शासनाच्या निर्णयाकडे वारकऱ्यांचे लक्ष
पिंपरी – येत्या 27 नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात होत आहे. कोरोनामुळं मागील दोन वर्षात वारकऱ्यांना कार्तिक वारीत सहभागी होता आले नाही. पण यंदाच्या कार्तिक वारीत तरी वारकऱ्यांना उपस्थित राहता येणार का नाही? याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती न मिळाल्यानं वारकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाखों वारकऱ्यांच्या नजर शासनाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडं लागल्या आहेत. […]
पिंपरी – येत्या 27 नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात होत आहे. कोरोनामुळं मागील दोन वर्षात वारकऱ्यांना कार्तिक वारीत सहभागी होता आले नाही. पण यंदाच्या कार्तिक वारीत तरी वारकऱ्यांना उपस्थित राहता येणार का नाही? याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती न मिळाल्यानं वारकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाखों वारकऱ्यांच्या नजर शासनाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडं लागल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यशासनाने कोरोनाच्या नियमांमध्ये बरीच शिथिलता आणता राज्यातील मंदिरे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. तसेच राज्यभर वेगवान पद्धतीने राबवलया जाणाऱ्या लसीकरण मोहिमेमुळं अनेक नागरिकांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाचा कार्तिकी वारी सोहळा लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न व्हावा, अशी इच्छा राज्यभरातील वारकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना सहभागी होता यावे असा प्रस्ताव जिल्हाधिकरी डॉ. विकास देशमुख यांच्याकडं दिवाळीपूर्वीच सादर करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. कार्तिकी वारीत सहभागी होण्यास परवानगी मिळाली तर सुमारे सहा ते सात लाखांहून अधिक भाविक यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शासनाने लवकर निर्णय घ्या दुसराकीडे कार्तिकी वारीची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळं त्यांच्या तयारी साठीही स्थानिक प्रशासन व देवस्थान समितीला योग्य वेळ मिळणे आवश्यक आहे साहजिकच शासने वारकऱ्यांच्या सहभागाबद्दल जो निर्णय तो लवकरात घ्यावा अशी मागणी देवस्थान समितीनं केली आहे. या निर्णयानंतरच वारीमध्ये सहभागी होण्यासाठी देवस्थानकडून दिंड्यांना सूचना देण्यात येतील अशी माहिती देवस्थान समितीनं दिली आहे.
हेही वाचा :
VIDEO: संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका