Maharashtra wine shops update | कोल्हापुरात दारुसाठी दोन गटात तुफान राडा

राज्यातील वाईन शॉप संबंधित महत्त्वाच्या घडामोडींवर (Maharashtra wine shops update) एक नजर

Maharashtra wine shops update | कोल्हापुरात दारुसाठी दोन गटात तुफान राडा
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 6:45 PM

[svt-event title=”कोल्हापुरात दारुसाठी दोन गटात तुफान राडा” date=”04/05/2020,6:38PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात दारुसाठी दोन गटात तुफान राडा, भाऊसिंगजी रोड वरील वाईन शॉपच्या दारात दोन गट भिडले, दुकानासमोर रांगा लावल्यावरुन वाद, पोलिसांकडून सौम्य लाठीहल्ला https://www.tv9marathi.com/live-tv  [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम” date=”04/05/2020,6:45PM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

[/svt-event]

[svt-event title=”दारुसोबत स्पिरीट टाकून पिल्यानं एकाचा मृत्यू” date=”04/05/2020,5:22PM” class=”svt-cd-green” ] बारामती : दारुसोबत स्पिरीट टाकून पिल्यानं एकाचा मृत्यू, बारामती तालुक्यातील शिरष्णे येथील घटना, नऊ जणांनी एकत्र येत पार्टी केली, पार्टीत दारुसोबत स्पिरिट किंवा सॅनिटायझरही घेतल्याचा संशय, बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार, उपचारादरम्यान दत्तात्रय वाघमारे यांचा मृत्यू, तर उर्वरीत आठ जणांना डिस्चार्ज [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम” date=”04/05/2020,5:08PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम, राज्य सरकारच्या निर्णयानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावतीने मद्य विक्री करणार नाही, असा निर्णय घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”दहिसरमध्ये वाईन शॉप्स सुरु, दुकानाबाहेर पोलिसांचा फौजफाटा, पोलिसांकडून नियम पाळण्याचे आवाहन” date=”04/05/2020,6:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यभरात दारु खरेदीसाठी झुंबड, रेशन दुकानापेक्षाही जास्त गर्दी वाईन शॉपवर ” date=”04/05/2020,6:26PM” class=”svt-cd-green” ] राज्यभरात दारु खरेदीसाठी झुंबड, रेशन दुकानापेक्षाही जास्त गर्दी वाईन शॉपवर  [/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहरात वाईन शॉप बंदचे आदेश” date=”04/05/2020,5:06PM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये मद्यपींसाठी निराशाजनक बातमी, शहरातील वाईन शॉप बंदचे आदेश, गर्दी वाढल्याने पोलीस आयुक्तांचा निर्णय

[/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अखेर पोलिसांकडून लाठीचार्ज” date=”04/05/2020,4:43PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : त्रम्बक नाका परिसरात वाईन शॉपजवळ पोलिसांकडून लाठीचार्ज, वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मद्यपींची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज, शहरात वाईन शॉप बाहेर तुफान गर्दी

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात दारु विक्रीला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर वाईन शॉपसमोर तुफान गर्दी” date=”04/05/2020,4:28PM” class=”svt-cd-green” ] पुणे : दारु विक्रीला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर वाईन शॉपसमोर तुफान गर्दी, 1 ते 2 किलोमीटर रांगा, सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा, पोलिसांनी वाईन शॉप बंद करुन गर्दी हटवली [/svt-event]

[svt-event title=”बेळगावात दारुची दुकानं सुरु, दुकानदारांकडून पहिल्या ग्राहकाची पूजा ” date=”04/05/2020,4:21PM” class=”svt-cd-green” ] कर्नाटक सीमेवरील बेळगाव इथली दुकाने सुरु, दारु खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या, दुकानदारांकडून दुकाने उघडताच ग्राहक देवो भव म्हणत पहिल्या ग्राहकाची पूजा, गेल्या दीड महिन्यापासून कोरडा घसा आज ओला होणार असल्याने मद्यप्रेमी खुश असल्याचे चित्र [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादमध्ये तळीरामांना दिलासा, आठवड्यातून 3 दिवस दारु विक्रिला परवानगी” date=”04/05/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये मद्यप्रेमींना दिलासा, आठवड्यातून 3 दिवस दारु विक्रिला परवानगी, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 10 ते 1 वेळेत दारु विक्रीला परवानगी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आदेश [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यातही दारुची दुकानं उघडणार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची माहिती” date=”04/05/2020,3:37PM” class=”svt-cd-green” ] पुणे : मद्य विक्रीला अटी आणि शर्तीनुसार परवानगी, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली परवानगी, मद्य घाऊक विक्रेते आणि किरकोळ मद्य विक्रीला परवानगी, वाईन शॉप बिअर शॉप आणि देशी दारु यांना परवानगी, ग्रामीण भागात सर्व मध्य निर्मिती चालू राहील, पुणे शहर आणि जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळून मद्य विक्रीला राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी  [/svt-event]

[svt-event title=”माहिममध्ये दारु घेण्यासाठी प्रचंड गर्दी, पोलीस येताच तळीरामांची पळापळ” date=”04/05/2020,3:26PM” class=”svt-cd-green” ] माहिममध्ये दारु घेण्यासाठी प्रचंड गर्दी  [/svt-event]

[svt-event title=”विरारमध्ये दारु दुकानांबाहेर गर्दी” date=”04/05/2020,3:12PM” class=”svt-cd-green” ] विरारमध्ये दारुचे दुकान उघडण्याआधीच तळीरामांच्या लांब रांगा  [/svt-event]

[svt-event title=”मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार, नाशिकच्या पठ्ठ्याचा निर्धार” date=”04/05/2020,3:41PM” class=”svt-cd-green” ] मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार, नाशिकच्या पठ्ठ्याचा निर्धार

[/svt-event]

[svt-event title=”सायन, काळाचौक, चेंबूर, विरार, आणि कल्याणमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करत मद्यपींच्या रांगा” date=”04/05/2020,3:46PM” class=”svt-cd-green” ] सायन, काळाचौक, चेंबूर, विरार, आणि कल्याणमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करत मद्यपींच्या रांगा  [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी शहरातील दारु दुकानांसमोर तळीरामांची मोठी गर्दी ” date=”04/05/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या दारू दुकानांसमोर तळीरामांनी मोठी गर्दी केली आहे. दारु दुकानांसमोर तळीरामांनी मोठी रांग लावली आहे. दारू दुकानांच्या समोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पण अद्याप शहरातील दारु दुकानं सुरु झाले नाहीत. [/svt-event]

[svt-event title=”चेंबूरमध्ये वाईन शॉप दुकानाबाहेर गर्दी झाल्याने दुकानं बंद ” date=”04/05/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] मुंबईच्या चेंबरू कॅम्प येथे दुकानाबाहेर उसळलेली गर्दी पाहता पोलिसांनी दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर हजारो लोकं उतरल्याने पोलीस आणि दुकानदारांमध्ये वाकयुद्द सुरु आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने वाईन शॉप मालकांनी दुकानं बंद केली आहे. [/svt-event]

[svt-event title=” भिवंडी शहरात वाईन शॉप दुकानाबाहेर गर्दी” date=”04/05/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी शहरात वाईन शॉप दुकानांबाहेर मद्यप्रेमींची मोठी गर्दी झाली आहे. दुकानं अजून उघडली नसून लोकं दुकाना बाहेर गर्दी करुन उभे आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात वाईन शॉप सुरु होणार नाही” date=”04/05/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ] अकोला जिल्ह्यात वाईन शॉप सुरु होणार नाहीत. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पूर्णपणे 100 टक्के लॉकडाऊन असणार आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत वाईन शॉप सुरु होणार नाही” date=”04/05/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यात वाईन शॉप सुरु होणार नाही. जिल्ह्यात पूर्णपणे लॉकडाऊन असेल फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये दारूची दुकाने उघडण्याला इम्तियाज जलील यांचा विरोध” date=”04/05/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत दारूची दुकाने उघडण्याला इम्तियाज जलील यांचा विरोध औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, असा इशारा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. दारुची दुकानं उघडण्याला जलील यांनी विरोध केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळमध्ये वाईन शॉपवर बंदी” date=”04/05/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ जिल्ह्यात वाईन शॉपवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर शहरात दारु विक्रीस परवानगी नाही” date=”04/05/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर शहरात दारु विक्रीस परवानगी नाही. त्याशिवाय दुकाने, सेवा आस्थापने, उपहारगृह/खानावळ, मॉल, सुपर मार्केट, शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मद्य विक्री सुरु न झाल्याने मद्यप्रेमींमध्ये निराशा” date=”04/05/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात मोठ्या प्रतिक्षेनंतर मद्य विक्री सुरु न झाल्यामुळे मद्यप्रेमी निराश झाले आहेत. वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस दुकानामसोर दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अंबरनाथमध्ये आजपासून दारुची दुकानं सुरु होणार” date=”04/05/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथमध्ये आजपासून दारुची दुकानं सुरु होणार आहेत. दारुच्या दुकानांबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून अनेकजण रांगेत उभे आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यातील वाईन शॉपबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी” date=”04/05/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] ठाण्यातील वाईन शॉपवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आहे. तर दुसरीकडे वाईन शॉप सुरु होणार नसल्याचे आवाहन पोलीस करत आहेत. जर कुणा रांग लावल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही पोलीस सांगत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”वसई विरार परिसरात वाईन शॉपबाहेर लोकांच्या रांगा” date=”04/05/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] वसई, विरार आणि नालासोपारामध्ये वाईन शॉप दुकानाबाहेर लोकांच्या सकाळपासून रांगा लागल्या आहेत. नालासोपारा पूर्व आचोले रोड वरील डिवाइन शॉपच्या बाहेर लोकांची लाईन लागली आहे. मात्र वाईनशॉप बंद आहेत. पालघर जिल्हा रेड झोनमध्ये येतो. वाईन शॉप उघडे ठेवायचे की नाही याबाबत अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. त्यमुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान चालू राहणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत वाईन शॉप सुरु होणार नाहीत” date=”04/05/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत वाईन शॉप सुरु होणार नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून वाईन शॉप सुरु होणार ” date=”04/05/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून वाईन शॉप सुरु होणार आहेत. वाईन शॉप अद्याप बंद असले तरी शॉपच्या बाहेर काही मद्यपी घुटमळत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व मद्यपी वाईन शॉप उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बाजारपेठेतील इतर दुकानं देखील हळूहळू सुरु होत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात वाईन शॉप बाहेर तोंडाला मास्क बांधून गर्दी ” date=”04/05/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील भांडारक रोडवर वाईन शॉपसमोर मद्य प्रेमींनी एकच गर्दी केली आहे. वाईन शॉप समोर मद्यपींनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. तोंडाला मास्क हातात पिशव्या घेऊन लोकांनी रांग लावली आहे. [/svt-event]

[svt-event title=”चेंबुरमध्ये वाईन शॉपच्या बाहेर मोठी रांग ” date=”04/05/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] चेंबुर कॅम्पमध्ये वीणा वाईन शॉप बाहेर मोठी रांग लागली आहे. सकाळपासून लोक रांगेत उभे आहेत. काही लोकं मोठ्या पिशव्या घेऊन आले आहेत. सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानाबाहेर रस्त्यांरव तीन फुटांवर वर्तूळ आखण्यात आले आहे. दुकान उघडण्यापूर्वीच लोकांनी रांग लावली आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.