पुणे शहरात गुलाबी थंडी, राज्यातील अनेक शहरांचा पारा घसरला

Weather Update Pune | राज्यात मॉन्सून गेल्यानंतर ऑक्टोबर हिट सुरु झाली. ऑक्टोबर हिटमुळे सर्वच शहरातील तापमान वाढले होते. परंतु गेल्या चार दिवसांत राज्यातील वातावरण बदलले आहे. राज्यातील सर्वत्र तापमान २ ते ४ अंश सेल्सियसने घसरले आहे.

पुणे शहरात गुलाबी थंडी, राज्यातील अनेक शहरांचा पारा घसरला
winterImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 9:01 AM

गजानन उमाटे, पुणे, नागपूर | 28 ऑक्टोंबर 2023 : ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील अनेक शहरांचे तापमान वाढले होते. सर्वच जण घामाघूम होत होते. कडक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. परंतु आता गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांचे तापमान घसरले आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाच्या कडाक्यातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान पुणे शहराचे नोंदवण्यात आले. तसेच कोकणातील रत्नागिरीत कमाल तापमान सर्वाधिक होते. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान कमी होणार असल्याचे पुणे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात सर्वात कमी तापमान पुणे शहराचे

राज्यात सर्वात कमी तापमानची नोंद पुणे शहरात झाली आहे. पुणे शहराचे तापमान १४.४ अंश सेल्सिअस होते. यामुळे पुणेकरांना आता गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस होते. मुंबईचे तापमान २४.८ सेल्सिअरपर्यंत आले आहे. महाबळेश्वर १५.६ अंशावर आले आहे. यामुळे महाबळेश्वरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यंटकांना थंडीचा अनुभव येत आहे.

विदर्भात गुलाबी थंडीची सुरुवात

नागपुरात गुलाबी थंडीची सुरुवात झाली आहे. गेल्या तीन- चार दिवसांत नागपूर शहरातील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस कमी झाले आहे. नागपूर शहराचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तापमान घसरल्यामुळे नागपूर शहरातील महाराजबाग प्राणीसंग्रहालयात रात्री हिटर्स लावले गेले आहे. महाराजबाग प्राणीसंग्रहालयात चार बिबटे आणि दोन वाघ आहेत. तसेच इतर प्राणी आहे. रात्री वाढलेल्या थंडीपासून वाघ आणि बिबट्याचं संरक्षण व्हावं, यासाठी हिटर्स लावले आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यात थंडी वाढणार

राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी वाढणार आहे. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. थंडी कमी राहणार असल्याचा परिणाम राज्यातील खरीप हंगामावर होणार आहे. कमी पाऊस आणि कमी थंडी याचा एकंदरीत परिणाम रब्बी हंगामावर होणार असून उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.