राज्यात सारं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा; शरद पवारांचा थेट इशारा!

शरद पवार म्हणाले, विरोधकांच्या दृष्टीने भावना झाली की, मंत्र्यांच्या चौकशा वगैरे होणार. अधिकारासाठी याचा वापर केला जातो. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.

राज्यात सारं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा; शरद पवारांचा थेट इशारा!
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 11:27 AM

नाशिकः राज्यात सारं काही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. मात्र, आम्ही जुळवून घेतलंय. तुम्ही दिवस मोजा, असं जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधकांना दिलं. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं, हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना तीन, चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी अमरावती आणि मालेगाव हिंसाचारावर दिली.

आता दिवस मोजा… शरद पवार म्हणाले, आम्ही जर ठरवून घेतलं आहे की, जुळवून घ्यायचं. त्यामुळं हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असं दिवस मोजायचं काम त्यांना करावं लागेल. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेंव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्यामुळं विरोधी पक्षाकडे चेहरा नाही, असं म्हणता येणार नाही. विक्रम गोखले यांच्या वक्तव्याची नोंद आपल्याला घ्यावी वाटत नाही. असे लोक समाजात, असा उल्लेख त्यांनी केला.

चौकशांत वरिष्ठ अधिकारी शरद पवार म्हणाले, विरोधकांच्या दृष्टीने भावना झाली की, मंत्र्यांच्या चौकशा वगैरे होणार. अधिकारासाठी याचा वापर केला जातो. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. नक्षलवाद महाराष्ट्रात वाढतोय असं नाही. खरोखरंच नक्षलवादी विचार ज्यांनी स्वीकारला तो वेगळा आहे. असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. आदिवासीवर काही अन्याय झाला असेल तर त्यांना नक्षलवादी ठरवता. मात्र, यात बॅलन्स ठेवायला हवा. माझ्या दृष्टने केवळ कायदा सुव्यवस्था प्रश्न नाही, सोशीत लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बाळाचा वापर करूनच हा प्रश्न सुटेल, असं बोलणं हे असत्य आहे. तिकडे विकास करायला हवा. त्यांना संधी द्यायला हवी.

एसटी बंद नैराश्यातून पवार म्हणाले, बंद आणि हिंसाचाराचा फटका सामान्यांना बसतो. एसटी बंदचा निर्णय नैराश्यातून आहे. सार्वजनिक शांततेला धक्का बसेल, असं काम काही एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायत हे दुर्दैव आहे. तुम्ही जिथे आहात तिथले प्रश्न सोडवले पाहिजेत. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा, असं म्हणणं अयोग्य आहे. न्यायालयाने देखील याबाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे. त्यामुळे यातून केवळ कामगारांचं नुकसान होतंय. एकादशीला असंख्य लोक वारीला जातात. आज त्यांचेही हाल होत आहेत. त्यांच्या आस्थेला धक्का बसविण्याच काम केलं जातंय.

इतर बातम्याः

शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे, शरद पवारांची प्रतिक्रिया

कारखानदारी हा धंदा आहे, राजकारण नाही; शरद पवारांचे निफाडमध्ये वक्तव्य

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.