Video : अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिलेकडे, कोण आहे ही रणरागिणी? वाचा सविस्तर
अजित पवारांचा दौरा नारायण राणे यांना टोलेबाजी करण्यावरून तर चर्चेत राहिलाच मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यात आणखी एक लक्षवेधी घटना घडली ती म्हणजे अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य हे महिला चालकाने केल्याचे दिसून आले.
सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर आहेत. अजित पवार डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये गेले आहेत. यावेळी अजित पवारांनी नारायण राणे यांचा त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला. त्यांचा हा दौरा नारायण राणे यांना टोलेबाजी करण्यावरून तर चर्चेत राहिलाच मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यात आणखी एक लक्षवेधी घटना घडली ती म्हणजे अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य हे महिला चालकाने केल्याचे दिसून आले. मागे अजित पवार बसतले होते, त्यावेळे स्टेअरिंगवर एक महिला चालक दिसून आली.
कोण आहेत त्या महिला चालक?
तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालक अजित पवारांची गाडी चालवताना दिसून आल्या. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून आले. बेधडक अजितदादांच्या गाडीचे स्टेरिंग एका महिलेच्या हातात बघून सर्वांनाच कौतूक वाटले. उपमुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट चालवणाऱ्या या रणरागिणीने या दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नारायण राणे यांनाही टोलेबाजी
संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण संस्था बंद करायला अक्कल लागत नाही, असा टोला भाषण करताना अजित पवारांनी नारायण राणे यांना लगावला आहे. कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. या बँका चांगल्या चालण्यासाठी आपले बहुमोल असं मत द्या. दोन महिलां मतदान करण्याचा , अनुसूचित जातीजमातीमागास प्रवर्ग, ओबीसी , एनटीला मतदान करण्याचा अधिकार आहे. सतीश सावंत स्वतंत्रपणे उभे आहेत, अश्या प्रकारे महाविकास आघाडीच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.