डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा मृत्यू, भरधाव पिकअपने जोडप्याला 7 फुटांपर्यंत फरफटत नेलं अन्…

अवैध वाळु वाहतूक करणारा पिकअप आणि मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून या महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत.

डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा मृत्यू, भरधाव पिकअपने जोडप्याला 7 फुटांपर्यंत फरफटत नेलं अन्...
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 10:02 AM

पंढरपूर : पंढरपूर इथं अंबाबाई पटांगणाच्या लगत असलेल्या चंद्रभागा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अवैध वाळु वाहतूक करणारा पिकअप आणि मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून या महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (woman killed on spot husband critically injured in truck bike accident in pandharpur)

पंढरपूर शहरातील गोविंदपुरा इथले पती-पत्नी सोलापूरच्या दिशेने निघाले असताना अंबाबाई मैदानालगत असलेल्या नवीन पुलावर हा अपघात घडला. त्यांच्या पाठीमागून प्रचंड वेगाने येणाऱ्या वाळुच्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जवळपास पन्नास ते साठ फुट त्यांना फरफटत नेलं. यामुळे अंगावर खोलवर जखमा झाल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जयश्री बारले या जागीच ठार झाल्या आहेत. तर प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर इथं हलवण्यात आलं आहे. अवैद्य वाळू वाहतुकीमुळे हा बळी गेल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जयश्री यांचा मृतेदह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर जखमी प्रकाश यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू पाहिल्याने प्रकाश बारले यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून बारले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (woman killed on spot husband critically injured in truck bike accident in pandharpur)

इतर बातम्या –

हायवाखाली ऑटो आला अन् अक्षरश: चुराडा झाला! गंगाखेडमध्ये भीषण अपघात, चार जण जागीच ठार

Kalyan | भाजप आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू, किसन कथोरे जखमी

(woman killed on spot husband critically injured in truck bike accident in pandharpur)

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.