सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या

जमिनीच्या वादातून एका सूनेनेच सासूची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (woman murdered her mother in law for property in Washim)

सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या
पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 5:52 PM

वाशिम : जमिनीच्या वादातून एका सूनेनेच सासूची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे सासूची हत्या केल्यानंतर सूनेने पोलिसात तक्रार केली होती. पण पोलिसांनी केलेल्या तपासात मृतक महिलेची सूनच मुख्य आरोपी असल्याचं उघड झालं. हा सर्व प्रकार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाणे हद्दीतील नगरदास येथे घडला. पोलिसांनी आरोपी सूनेला मंगळवारी (9 मार्च) रात्री उशिरा अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत या घटनेचा छळा लावला (woman murdered her mother in law for property in Washim).

सकाळच्या वेळी महिलेची हत्या

आरोपी महिलेचं नाव रेखा विजय देवळे असं आहे. या महिलेने काल (9 मार्च) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपली सासू प्रमिलाबाई देवळे या महिलेचा खून झाल्याची तक्रार मालेगाव पोलिसांकडे केली. मालेगाव शहराजवळून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या नागपूर-मुंबई या महामार्गावरील नागरदास या गावात ही घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी आपल्या लवाजम्यासह घटनास्थळ गाठून चाचपणी केली. यावेळी वृद्ध महिलेच्या गळ्याला दोरी आवळून खून करण्यात आला असल्याचे दिसून आले (woman murdered her mother in law for property in Washim).

पोलिसांचा सूनेवर संशय

आरोपी अज्ञात असल्याने मालेगाव पोलिसांनी तात्काळ श्वानपथकासह फॉरेन्सिक लॅबचे पथक नागरदास येथे पाचारण केले. श्वान पथकाच्या दिशादर्शक हालचालींवरून मृतक प्रमिला केशव देवळे यांची सून रेखा विजय देवळे हिच्यावरच संशय आला. त्यावरून मालेगाव पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. यावेळी रेखा विजय देवळे हिनेच आपली सासू प्रमिलाबाईचा काटा काढला असल्याचे प्राथमिक चौकशीतून दिसून आले.

काही दिवसांआधी आरोपी महिलेच्या पतीचाही खून

प्रमिलाबाई केशव देवळे या महिलेच्या नावाने कौटुंबिक शेतजमीन होती. या जमिनीची रेखा विजय देवळे ही त्यांची सूनच वहिवाटदार होती. काही महिन्यांआधी आरोपी महिलेचे पती विजय केशव देवळे यांचा नागरदास येथेच खून झाला होता. त्यानंतर सदर जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी रेखा विजय देवळे या महिलेचे तिची सासू प्रमिलाबाई केशव देवळे यांच्याशी खटके उडत होते. त्यामुळे सासूचा काटा काढून वारसा हक्काने जमीन बळकवण्यासाठी रेखा देवळेने हत्या केली.

सूनेने सासूची हत्या केली

प्रमिलाबाई देवळे सकाळी गावालगतच्या हागंदारीमध्ये शौचास गेली असताना त्यांची सून रेखाने दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी याप्रकरणी सून रेखा हीला अटक केली. त्याचबरोबर तिच्या संपर्कात असलेल्या डिगांबर अवधूत देवळे यालादेखील पोलिसांनी अटक केली. दोघी आरोपींना कलम 302 अंतर्गत काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. दरम्यान, दोघी आरोपींना पोलीस कोठडी करिता न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : देशात बलात्कार, जातीय दंगली घटल्या; गृहमंत्रालयाचा दावा

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.