खूशखबर! घरबसल्या करा ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज, एकदम सोपी आहे पद्धत

राज्यभरातील महिला आणि मुली आता घरबसल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करु शकतात. राज्य सरकारने यासाठी सोपी पद्धत आणली आहे. महिला आता नारीशक्ती अ‍ॅपद्वारे घरबसल्या आपला अर्ज सरकारकडे दाखल करु शकतात. हा अर्ज नेमका कसा भरावा? याची माहिती आम्ही तुम्हाला थोडक्यात देणार आहोत.

खूशखबर! घरबसल्या करा 'लाडकी बहीण योजने'साठी अर्ज, एकदम सोपी आहे पद्धत
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 5:01 PM

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यभरात सध्या याच योजनेची चर्चा सुरु आहे. या योजनेची चर्चा होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी वार्षित उत्पन्न करणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला आता 1500 रुपये मदत म्हणून देणार आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून ही आर्थिक मदत राज्यभरातील महिलांना करणार आहे. या योजनेच्या घोषणेनंतर राज्य सरकारने 5 एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांनाही अर्ज करता येईल, अशी सुधारणा निकषांमध्ये केली. या योजनेच्या घोषणानंतर तहसील कार्यालयांवर महिलांची मोठी गर्दी होऊ लागली. विविध कागदपत्रे बनवण्यासाठी ही गर्दी जमत होती. ही गर्दी पाहून राज्य सरकारने कागदपत्रांमध्येही शिथिलता दिली. आता महिलांच्या जन्मदाखला, मतदान ओळखपत्र यांच्यावरही त्यांना अर्ज करता येणार आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांची सेतू कार्यालयांवर होणारी गर्दी पाहता सरकारने एक अ‍ॅपदेखील आणलं आहे. या अ‍ॅपमधून महिला घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करु शकणार आहेत. ‘नारीशक्ती दूत’ असं या अ‍ॅपचं नाव आहे.

स्वतःच करू शकता लाडकी बहीण योजनेचा अर्ज

लाडकी बहीण योजनेचा अर्ज घरबसल्या करण्यासाठी आधी https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot या लिंकला क्लिक करून प्लेस्टोर वरून नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. यामध्ये नोंदणी करून आपण अर्ज भरू शकता. या अ‍ॅप्लीकेशनमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून लॉगिन करून घ्यावे. नंतर प्रोफाइल भरून अपडेट करावे. प्रोफाईलमध्ये आपले संपूर्ण नाव, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार: सामान्य नारी हा निवडावा.

प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर नारीशक्ती दूत या बटणावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड नंबर, घराचा पत्ता, मोबाईल नंबर, वैवाहिक स्थिती, बँकेचे नाव, खाते नंबर, IFSC कोड इत्यादी माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.

यानंतर ‘ही’ कागदपत्र अपलोड करावीत

  • आधार कार्ड
  • अधिवास/जन्म प्रमाणपत्र : यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड किंवा पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड अपलोड करावे.
  • उत्पन्न प्रमाणपत्र: यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड अपलोड करावे. (ऑनलाइन प्रिंट केलेले सुद्धा चालते).
  • अर्जदाराचे हमीपत्र : यामध्ये हमीपत्र अपलोड करावे.
  • बँकेचे पासबुक
  • अर्जदाराचा लाईव्ह फोटो
  • इत्यादी कागदपत्रे अपलोड करून माहिती जतन करा यावर क्लिक करावे.

कागदपत्रे सबमिट केल्यावर काय करावं?

यानंतर आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला दाखवली जाते. ती माहिती तपासून घेऊन खाली फॉर्म सबमिट करा, या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या मोबाईलनंबर वरती ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून आपला फॉर्म सबमिट करावा. केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये आपला सबमिट अर्ज आपल्याला दाखवेल.

Non Stop LIVE Update
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले.
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका.
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.