‘आता बस झालं छमछम, बार बंद करा’, लेडीज बार बाहेर संतप्त महिलांचा एल्गार
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात भर वस्तीत एक लेडीज बार आहे (Women Protest to close Ladies Bar in Kalyan)
ठाणे : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात भर वस्तीत एक लेडीज बार आहे (Women Protest to close Ladies Bar in Kalyan). या लेडीज बारमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील संतप्त महिलांनी आज (11 जानेवारी) बार मालकाविरोधात एल्गार पुकारत थेट लेडीज बारवर धडक दिली. महिलांच्या आक्रोशामुळे अखेर बार मालकाला नमावं लागलं. बार मालकाने तात्पुरता बारचं शरट बंद केलं. त्यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी भर वस्तीत चालणाऱ्या लेडीज बारच्या चालकाला समज दिली.
या बारचं नाव सत्यम लेडीज बार असं आहे. माजी नगरसेविका निर्मला रायभोळे यांच्यासह या परिसरातील महिलांनी सत्यम लेडीज बारच्या विरोधात आंदोलन केले. हा लेडीजबार चाळवजा भर वस्तीत आहे (Women Protest to close Ladies Bar in Kalyan).
लेडीज बारचा नागरिकांना प्रचंड त्रास
रात्री बारमधून मद्यधुंद व्यक्ती बाहेर उभे राहून नागरिकांना त्रास देतात. बार समोर गाड्या कुठेही लावल्या जातात. हा लेडीज बार उशिरापर्यंत चालतो. या बारमधील लेडीज रात्री उशिरापर्यंत चाळीच्या चिंचोळया मार्गातून ये-जा करतात. चांगल्या घरातील महिलांनाही या बारमध्ये येणारे लोक वाईट नजरेने बघतात.
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
या बारमध्ये मोठ्या आवाजाने डिस्को गाणी वाजविली जातात. या आवाजाच्या त्रसाने वस्तीतील नागरीकांची झोपमोड होते. रविवारी रात्री या बारमधील मालकास गाण्याचा आवाज कमी ठेव असे सांगण्यासाठी काही मुले गेली होती. मात्र, बार चालकाचे समर्थक या मुलांच्या अंगावर धावून गेले. आज शेकडो महिलांनी बारवर धडक दिली. विशेष म्हणजे हा बार कोळसेवाडी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.
पोलिसांची भूमिका काय?
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “बारसमोर पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच बारमध्ये जोराने गाणी वाजविली जातात. या बारमधील गाण्याच्या आवाजाचे डिसीबल यंत्रणाच्या सहाय्याने मोजमाप करुन आवाज जास्त आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं साळवे यांनी सांगितलं.