VIDEO | पदर खोचला, मैदानात उतरल्या, खासदार नवनीत राणा खो-खो स्पर्धेत अव्वल
जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती शहरात आयोजित खो-खो स्पर्धेत खासदार नवनीत राणांनी भाग घेतला. नवनवीत राणा नुसत्या भाग घेऊनच थांबल्या नाहीत तर त्यांनी खो-खो स्पर्धेत प्रथम पारितोषिक देखील पटकावले आहे. खासदार नवनीत राणांचा खो-खो स्पर्धेतील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
अमरावती : खासदार नवनवीन राणा (MP Navneet Rana) या नेहमी या न त्या कारणांवरुन चर्चेत असतात. खासदार राणा या कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेतात, तर कधी नवरात्री उत्सव असो वा मेळघाटमधील होळीचे आदिवासी नृत्य असो नवनीत राणा कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चच्या केंद्रस्तानी असतात. राजकारणाबरोबरच त्या मैदानी खेळामुळे देखील अनेकदा चर्चत आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मैदानी खेळ खेळून उपस्थितांची मने जिंकली. नवनीत राणांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात आयोजित केलेल्या महिलांच्या खो-खो स्पर्धेत भाग घेतला. नवनवीत राणा नुसत्या भाग घेऊनच थांबल्या नाहीत तर त्यांनी खो-खो (Kho Kho) स्पर्धेत प्रथम पारितोषिक देखील पटकावले आहे. खासदार नवनीत राणांचा खो-खो स्पर्धेतील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
महिला दिनाचे औचित्य
जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी देखील होतात. यावेळी पोरितोषिक देण्यासाठी जर महिला नेत्या किंवा राजकारणी आल्यास महिलांना आणखी आनंद होतो. मात्र, अमरावतीमध्ये उपस्थितांना थोडा वेगळा अनुभव आला. खासदार नवनीत राणा खुद्द मैदानात उतरल्या आणि त्यांनी खो-खो स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिकही पटकावले. यावेळी उपस्थितांची राणांना आपल्या मैदानी खेळातून मने जिंकली.
अन् मोह आवरला नाही!.
अमरावती शहरातील क्रांती कॉलनी येथे महिलांच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून खासदार नवनीत राणा यांना आमंत्रित करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर महिला खो-खो खेळत होत्या. यावेळी शांत बसणार त्या नवनीत राणा कसल्या. यावेळी खासदार नवनीत राणांना खो-खो खेळण्याचा मोह आवरला नाही. लागलीच त्यांनी पदर खोचला आणि खो-खो स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी स्पर्धेत सुसाट धावत आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानी खेळातून आपली कसब दाखवत प्रथम पारितोषिक देखील पटकावले. खासदार नवनीत राणांचा खो-खो स्पर्धेतील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
इतर बातम्या