Worli Assembly Election Results 2024 : सर्वात मोठी बातमी ! वरळीत आवाज कोणाचा ? अखेर निकाल आला समोर

Worli Assembly constituency : वरळीत मविआतर्फे ठाकरे गटाला ही जागा मिळाली, तेथे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतीने मिलिंद देवरा याना मैदानात उतरवलं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही लढत तिरंगी झाली होती. चुरशीच्या या निवडणुकीत अखेर कोणी बाजी मारली त्याचा निकाल समोर आला आहे

Worli Assembly Election Results 2024 : सर्वात मोठी बातमी ! वरळीत आवाज कोणाचा ? अखेर निकाल आला समोर
वरळीत तिरंगी लढत
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 12:56 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक हायव्होल्टेज लढती पहायला मिळाल्या. वरळीतील लढतीकडेही अनेकांचं लक्ष लागलं होतं. तेथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसे आणि महायुतीचा उमेदवार, अशा दोघांचं आव्हान होतं. वरळीत मविआतर्फे ठाकरे गटाला ही जागा मिळाली, तेथे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतीने मिलिंद देवरा याना मैदानात उतरवलं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही लढत तिरंगी झाली होती. 20 नोव्हेंबरला मतदान झालं.  चुरशीच्या या निवडणुकीत अखेर कोणी बाजी मारली त्याचा निकाल आता समोर आला आहे.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. विद्यमान आमदार वि. महायुती आणि मनसे अशी लढत चुरशीची ठरली. मिलिंद देवरा लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आले आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर खासदारही केलं. पण वरळीतून टक्कर देणारा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मिलिंद देवरा यांना पुढं केलं.

मनसेनेही उभा केला उमेदवार

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. तेव्हा महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेतर्फे आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला होता. पण यंदा मात्र ( 2024च्या निवडणुकीत) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार उतरवला. मनसेने संदीप देशपांडे यांना तिकीट दिलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर दोन तगड्या उमेदवारांचं आव्हान होतं. वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. वरळीत अमराठी मतंही मोठी असून देवरांनी अमराठी मतांवर पकड आहे. वरळीत गुजराती मतदारांचीही संख्या निर्णायक ठरु शकतात. 2019 मध्ये सोप्या लढाईत आदित्य ठाकरे यांनी 89 हजार 248 मतं घेत विजय मिळवला होता. पण नुकत्याच झालेल्या दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत, वरळीतून ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी फक्त 6175 मतांवर आली.

दरम्यान भाजपकडून वरळीत लढण्यासाठी शायना एन.सी या उत्सुक होत्या, मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेला आणि शायना यांचा पत्ता कट झाला. मात्र एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना उतरवून वरळीच्या लढाईत मोठा ट्विस्ट आणला.

अखेर आता या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.

वरळी कागल विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.