थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण…

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे.

थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण...
Yashwant Sugar & PowerImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 9:17 AM

सांगली : यशवंत कारखान्याविरोधातील (Yashwant Sugar & Power) कामगार आंदोलकाचा मृत्यू झाल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. आज ७५ वा दिवस होता असं सहकारी सांगत आहेत. विट्यात सलग 72 दिवस ऊन वारा पाऊस झेलत आंदोलनास बसलेल्या यशवंत साखर कामगारांपैकी एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू (Death of agitator) झाला. अमृत यशवंत लोंढे (वय 65) (Amrut yashwant londhe) असे त्यांचे नाव असून येथील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांची तब्येत खालावत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सहकारी सांगत आहेत.

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन 2012 मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले.

त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण 8 कोटी 28 लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. जिल्हा बँक ह्या कामगारांचे पैसे गेले 20-12 वर्षे बिन व्याजी वापरत आहे. ते परत मिळावेत म्हणून 1 फेब्रुवारीपासून या कामगारांनी धरणे आंदोलन सुरु आहे. परवा गुरूवारी संध्याकाळी वाळूज येथील अमृत लोंढे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकारी आंदोलकांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले.

हे सुद्धा वाचा

पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. अखेर लोंढे यांचा मृत्यू झाला. अमृत लोंढे यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. जिल्हा बँकेकडून त्यांना वेळेत पैसे मिळाले असते तर तर त्या कुटुंबावर ही वेळ आली नसती अशी लोकं चर्चा करीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.